Join us  

लाहोरमध्ये झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयची अनुपस्थिती

बीसीसीआयने सुरक्षेची चिंता व भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सध्याचा राजकीय तणाव या पार्श्वभूमीवर शनिवारी लाहोरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एससीसी) बैठकीसाठी आपला प्रतिनिधी पाठविला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:30 AM

Open in App

राची : बीसीसीआयने सुरक्षेची चिंता व भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान सध्याचा राजकीय तणाव या पार्श्वभूमीवर शनिवारी लाहोरमध्ये झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एससीसी) बैठकीसाठी आपला प्रतिनिधी पाठविला नाही.यावेळी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) प्रमुख नजमुल हसन यांनी एहसान मनी यांच्या स्थानी २०२० पर्यंत एसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.पीसीबीचा एक अधिकारीने म्हटले की, ‘बैठकीत अनुपस्थित असलेल्यांमध्ये भारत प्रमुख देश होता. त्यात एसीसीची मान्यता असलेल्या ३३ देशांचे प्रतिनिधी सहभागी होते. त्यात बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान यासारख्या पूर्णकालिक सदस्य देशांचा समावेश होता. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यावेळी सहभागी झाले होते.’पीसीबीच्या सूत्रानी सांगितले, ‘बीसीसीआयने पीसीबी व एसीसीला सध्याचा राजकीय तणाव व सुरक्षा या कारणांमुळे आम्ही बैठकीत सहभागी होण्यास असमर्थ असल्याचे कळवले. एसीसीच्या ३५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत एसीसीच्या आमसभेत सहभागी झालेला नाही.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय