मुंबई : रणजी चषक स्पर्धेत बाद फेरी गाठण्यासाठी त्रिपूराविरुद्धचा अखेरचा साखळी सामना जिंकणे मुंबईसाठी अनिवार्य असतानाच, या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायरला संघाबाहेर बसविण्यात आले आहे. यंदाच्या मोसमात खराब फॉर्म राहिलेल्या नायरला संघव्यवस्थापनाने संघाबाहेर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
२५ नोव्हेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर मुंबईकर त्रिपूराच्या आव्हानाला सामोरे जातील. बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला कोणत्याही परिस्थितीमध्ये केवळ विजयच आवश्यक आहे. त्यामुळेच, यंदा अपयशी ठरलेल्या नायरला संघाबाहेर बसविण्याचा कठोर निर्णय मुंबई संघाने घेतला. यंदाच्या सत्रात नायरने केवळ १३० धावा काढताना ८ बळी घेतले आहेत. त्याचवेळी, डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिलने पुनरागमन केले आहे. फिरकी गोलंदाज आदित्य धुमाळनेही संघात स्थान मिळवले आहे.
‘क’ गटा३ं मुंबई १४ गुणांसह तिसºया स्थानी असून आंध्र प्रदेश (१९) व मध्य प्रदेश (१५) अनुक्रमे पहिल्या व दुसºया स्थानी आहेत. आंध्र प्रदेशचे सर्व साखळी सामने झाले असून मध्य प्रदेश आपला अखेरचा साखळी सामना ओडिशाविरुद्ध खेळेल.
>मुंबईचा संघ : आदित्य
तरे (कर्णधार), सूर्यकुमार
यादव (उपकर्णधार), जय बिस्ता, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सिध्देश लाड, आकाश पारकर, कर्ष कोठारी, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, मिनाद मांजरेकर, विजय गोहिल, अखिल हेरवाडकर आणि सुफियान शेख.