Abhinav Tejrana Hits Double Century In Ranji Trophy Debut : रणजी करंडक स्पर्धेतील २०२५-२६ च्या हंगामात गोव्याच्या संघाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या अभिनव तेजराणा याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमीच्या मैदानात रंगलेल्या चंदीगड विरुद्धच्या सामन्यात या पठ्ठानं पहिल्या डावात द्विशतक झळकावले. रणजी सामन्यातील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ३२० चेंडूत २०५ धावांच्या खेळीसह अभिनव तेजराणा गोवा संघाकडून रणजी पदार्पणात द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी द्विशतकासह तो दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला
डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अभिनव तेजराणा याने या विक्रमी द्विशतकासह एलिट क्लबमध्ये एन्ट्री मारली आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात मोजक्या १४ खेळाडूंनी पदार्पणात द्विशतक झळकावले आहे. गोव्याच्या २४ वर्षीय बॅटरनं या यादीत असलेल्या गुंडप्पा विश्वनाथ आणि अमोल मुजुमदार या दिग्गजांच्या पक्तींत स्थान मिळवले आहे.
Mohammed Shami Over Hat Trick : रणजी मॅचमध्ये शमीचा जलवा; 'ओव्हर हॅटट्रिक'सह आगरकरांना कडक रिप्लाय
अर्जुन तेंडुलकरनं पदार्पणात मारलेली सेंच्युरी
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील यंदाच्या हंगामात गोव्याच्या संघाचा भाग आहे. २०२२ मध्ये याच संघाकडून पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरनं शतकी खेळी साकारली होती. बॉलिंग ऑलराउंडर असलेल्या अर्जुन तेंडुलकरनं राजस्थान विरुद्धच्या सामन्यात २०७ चेंडूत १२० धावांची खेळी केली होती. पण तो द्विशतकी डाव साधण्यात अपयशी ठरला होता.
रणजी करंडक स्पर्धेत पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावणारे फलंदाज
- गुंडप्पा विश्वनाथ
- अमोल मुझुमदार
- अंशुमन पांडे
- मनप्रीत जुनेजा
- जीवनजोत सिंह
- अभिषेक गुप्ता
- अजय रोहेरा
- मयंक राघव
- सकीबुल गनी
- पवन शाह
- सुवेद पार्कर
- जय गोहिल
- अभिनव तेजराणा
- आयुष डोसेजा
अभिनवच्या द्विशतकी खेळीशिवाय ललित यादवनं ३९३ चेंडूत केलेल्या २१३ धावांच्या खेळीच्या जोरावर गोवा संघाने चंदिगडसमोर ५३२ धावांचा टोंगर उभारला आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना चंदीगड च्या संघाला अर्जुन तेंजुलकरनं पहिला धक्का दिला. दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी १ विकेटच्या मोबदल्यात ३४ धावा केल्या होत्या.