IPL 2021: एबी डी'व्हिलियर्सला बाद होताना पाहून त्याच्या मुलाचा संताप, Video व्हायरल...

IPL 2021, MI vs RCB: वडील स्वस्तात बाद झाल्यानंतर मुलाला आला राग, डीव्हिलियर्सच्या मुलाचा व्हिडिओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:03 PM2021-09-27T17:03:49+5:302021-09-27T17:05:55+5:30

ab de villiers kids get angry after his dad got out against mumbai indians | IPL 2021: एबी डी'व्हिलियर्सला बाद होताना पाहून त्याच्या मुलाचा संताप, Video व्हायरल...

IPL 2021: एबी डी'व्हिलियर्सला बाद होताना पाहून त्याच्या मुलाचा संताप, Video व्हायरल...

Next

IPL 2021, MI vs RCB: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (royal challengers bangalore) यांतील लढतीत बंगलोर सामना ५४ धावांनी जिंकला. पण एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

ट्वेन्टी-२० वर्ल्डकप आधीच टीम इंडियासाठी वाईट बातमी, हार्दिक पंड्या संघाबाहेर होण्याचा धोका!

बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली होती. कर्णधार कोहली जबरदस्त फॉर्मात दिसून आला. बंगलोरनं मुंबईसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १११ धावांतच गारद झाला. सामन्याच्या पहिल्या डावात म्हणजेच बंगलोरची फलंदाजी सुरु असताना एका प्रसंगानं सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एबी डीव्हिलियर्स मैदानात फलंदाजी करत होता आणि तो ११ धावांवर बाद झाला. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर कॅमेरा थेट प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये फिरवण्यात आला जिथं डीव्हिलियर्सची पत्नी आणि त्याचा चिमुकला मुलगा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. यावेळी वडील स्वस्तात बाद झालाचा संताप मुलाला आवरता आला नाही. आपला हात आपटून तो वडील बाद झाल्याचा राग व्यक्त करताना दिसला. मग काय सोशल मीडियात हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा केली जात आहे. 

दरम्यान, बंगलोर संघानं दुसऱ्या टप्प्यातील सलग तीन पराभव पत्करल्यानंतर मुंबई विरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईच्या संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. मुंबई विरुद्धच्या सामन्यात विराट व मॅक्सवेल यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केली. तर जसप्रीत बुमराहनं १९व्या षटकात दोन मोठे धक्के देत RCBच्या धावांना चाप लावली होती. विराटनं ४२चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता.  मॅक्सवेलनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते.

Web Title: ab de villiers kids get angry after his dad got out against mumbai indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app