Join us  

VIDEO: चहलनं ड्रेसिंग रुममध्ये 'कॉपी' केली मॅक्सवेलनं टिपलेल्या झेलची 'स्टाईल', 'असं' झालं सेलिब्रेशन!

IPL 2021, RCB vs MI: आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघानं मुंबई इंडियन्सवर (MI) ५४ धावांनी दमदार विजय साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 1:37 PM

Open in App

IPL 2021, RCB vs MI: आयपीएलमध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघानं मुंबई इंडियन्सवर (MI) ५४ धावांनी दमदार विजय साजरा केला. सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आरसीबीनं पुनरागमन केलं आणि गुणतालिकेत आपलं स्थान पक्क केलं. विराट कोहली, एबीडी व्हिलियर्स, युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जोरदार आनंद साजरा केला. 

बंगलोरच्या संघानं याचा एक व्हिडिओ शेअर केला असून यात संघाचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. सामन्यात युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या समन्वयानं मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. युजवेंद्र चहलच्या फिरकीवर ग्लेन मॅक्सवेलनं अप्रतिम झेल टिपला होता. मॅक्सवेलनं टिपलेल्या झेलची नक्कल करत युजवेंद्र चहलनं ड्रेसिंग रुममध्ये धमाल केली. त्यावर मॅक्सवेलनंही युजवेंद्रच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. मॅक्सवेलला सामन्यातील सर्वोत्तम झेल टिपल्याचा पुरस्कार देण्यात आला. पण मॅक्सवेलनं मोठ्या मनानं युजवेंद्र चहलनं सुर्यकुमार यादवचा टिपलेला झेल माझ्यापेक्षाही सुंदर होता असं म्हणत तोच खऱ्या पुरस्काराचा मानकरी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. 

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरग्लेन मॅक्सवेलयुजवेंद्र चहल
Open in App