Join us  

CSK २०१०चा करिष्मा करून दाखवणार, आकडे सांगतात IPL 2020 जिंकणार!; आकाश चोप्राचं ट्विट व्हायरल

Indian Premier League ( IPL 2020) चे १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 13, 2020 8:45 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) चे १३वे पर्व मध्यंतरात आले आहे. सर्व संघांनी प्रत्येकी ७ सामने खेळले आहेत. आयपीएल २०२०च्या पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) या दोन संघांची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. स्फोटक सुरुवात करून देणारे सलामीवीर, गडगडणारा डाव सावरणारी भक्कम मधली फळी, अखेरच्या षटकांत धावांचा पाऊस पाडणारे धडाकेबाज फलंदाज, प्रतिस्पर्धींच्या धावांवर वेसण घालणारे गोलंदाज अन् चपळ क्षेत्ररक्षक या सर्व आघाड्यांवर MI व DC हे दोन्ही संघ इतरांपेक्षा उजवे ठरत आहेत. पण, यंदा सप्राईज पॅकेज ठरत आहेत तो विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore)...

CSK चा संघ यंदा प्ले ऑफपर्यंत मजल मारेल का? यावर सट्टा लावला जात आहे आणि बरीच जण 'नाही' याच पक्षातील आहेत. डॅडी आर्मी असलेल्या चेन्नईनं यंदाच्या लीगमध्ये सपशेल निराश केले. सुरेश रैना व हरभजन सिंग यांच्या माघारीनंतर बसलेल्या धक्क्यातून संघ डोकं वरच काढताना दिसत नाही. त्यात प्रत्येक सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) प्रयोग सुरू आहेत, फलंदाज अपयशी ठरत आहेत, हेच सांगतोय. ७ पैकी २ विजय मिळवून ४ गुणांसह सातव्या स्थानावर असलेला हा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवेल, याची शक्यता अंधुक आहे. पण, २०१०मध्ये अशाच परिस्थितीतून चेन्नईनं थेट अंतिम फेरीत प्रवेश करून जेतेपद पटकावले होते. पण, तेव्हाचा संघ अन् आताच्या वाढलेल्या वयाचे खेळाडू यात फरक आहे. त्यांना ७ पैकी ६ सामने जिंकावेच लागतील.

पण, आकाश चोप्रानं ( Aakash Chopra) CSKच्या चाहत्यांना चिअर करण्यासाठी एक आकड़ेवारी पोस्ट केली आहे आणि २०१०चा योगायोग २०२०मध्येही जुळून आल्यास चेन्नई सुपर किंग्स जेतेपद निश्चित पटकावू शकतो... पाहा काय आहे ती आकडेवारी. 

२०१०                                                           आयपीएलचे तिसरे सत्र                             ७ सामन्यानंतर ७व्या स्थानी                     किंग्स इलेव्हन पंजाब ८व्या स्थानी           मध्यंतरात दोन संघांच्या खात्यात ६ गुण  मुंबई इंडियन्स अव्वल स्थानी                   

 

 २०२०

बंदीनंतर CSKचे आयपीएलमधील तिसरे सत्र यंदाही ७ सामन्यानंतर ७व्या स्थानीकिंग्स इलेव्हन पंजाब ८व्या स्थानीमध्यंतरात दोन संघांच्या खात्यात ६ गुणमुंबई इंडियन्स अव्वल स्थानी 2010 च्या स्पर्धेत सीएसकेने साखळीचे 14 पैकी सात सामने जिंकले व सात गमावले होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक विजय मुंबई इंडियन्स (10) व डेक्कन चार्जर्सच्या (8) नावावर होते पण शेवटी विजेतेपदाची ट्रॉफी चेन्नईनेच मुंबईला 22 धावांनी नमवून उंचावली होती. त्यामुळे धोनी आणि कंपनीला अजूनही संधी आहे असेच म्हणता येईल. 

2010 मधील पहिले सात सामने1) वि. डेक्कन चार्जर्स- पराभव2) वि. नाईट रायडर्स-  विजय3) वि. दिल्ली डेअरडेविल्स- विजय4) वि. किंग्ज इलेव्हन- पराभव (सुपर ओव्हर) 5) वि. रॉयल चॅलेंजर्स- पराभव6) वि. मुंबई इंडियन्स- पराभव7) वि. राजस्थान रॉयल्स- पराभव 

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी