Join us  

Ravindra Jadeja Vs CSK : जे Suresh Raina सोबत घडलं, तेच रवींद्र जडेजासोबतही घडणार; अष्टपैलू खेळाडू पुढल्या वर्षी CSKकडून नाही खेळणार; माजी खेळाडूचा दावा 

Ravindra Jadeja Vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे अचानक सोपवण्यात येते, तसे ते अचानक काढूनही घेतले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 3:50 PM

Open in App

Ravindra Jadeja Vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व रवींद्र जडेजाकडे अचानक सोपवण्यात येते, तसे ते अचानक काढूनही घेतले जाते. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) उत्तराधिकारी म्हणून जडेजाकडे पाहिले जात होते आणि त्यामुळेच आयपीएल २०२२साठी कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली गेली. पण, समाधानकारक कामगिरी न झाल्याने त्याच्याकडून नेतृत्व काढून पुन्हा धोनीकडे सोपवले गेले. या गोष्टी वरवर जेवढ्या सोप्या सरळ दिसतात तेवढ्या त्या नक्की नाहीत. कर्णधारपद गेल्यानंतर आता तर जडेजाने दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधूनच माघार घेतल्याचे फ्रँचायझीने जाहीर केले. जडेजाला दुखपात झालीय हे खरं आहे, परंतु त्याची माघार त्यामुळेच आहे, याबाबत शंका आहे. कर्णधारपद काढून घेतल्यानंतर जडेजा निराश असल्याची चर्चा होती आणि संघ व्यवस्थापन त्याच्या कामगिरीवर फार खूश नसल्याचेही बोलले जातेय. इंस्टाग्रामवरून CSK चे जडेजाला अनफॉलो करणे, हे या सर्व चर्चांना खतपाणी घालणार आहे.

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सची प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यात जडेजा व फ्रँचयाझीच्या वादाच्या बातम्या समोर येत आहेत. अशात २०२१मध्ये जे सुरेश रैना ( Suresh Raina) सोबत घडले, तेच आता जडेजा सोबत घडतेय, असे चित्र समोर दिसतेय. पण, या सर्वांवर CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी मौन सोडले आहे. रवींद्र जडेजा भविष्यातही CSKचाच भाग राहील असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याला तसं वाटत नाही. त्याच्यामते जडेजा लवकरच CSK ला गुडबाय म्हणेल आणि २०१२पासून असलेलं नातं तोडेल.  

रवींद्र जडेजाचे चेन्नई सुपर किंग्ससोबत फिसकटले?; फ्रँचायझीने इंस्टाग्रामवर अनफॉलो केले! 

''रवींद्र जडेजा आता पुढील सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, परंतु मला असं वाटतंय की तो पुढील वर्षी या संघासोबतच नसेल. चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात नेमकं काय चाललंय, हे कुणालाच ठाऊक नाही. खेळाडू जखमी  होतो किंवा त्याला वगळले तरी जातेय. २०२१मध्ये सुरेश रैनासोबतही असेच घडले होते. काही सामन्यानंतर त्यांनी अचानक रैनाला बाहेरच केले,''असे चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले.  

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आजच्या महत्त्वाच्या लढतीत जडेजाशिवाय चेन्नई मैदानावर उतरणार आहे आणि हा संघाला मोठा धक्का आहे. ''प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी चेन्नईला विजय मिळवणे गरजेचा आहे. हे खूप अवघड गणित आहे, परंतु तसं होऊ शकतं आणि त्यासाठी विजय महत्त्वाचा आहे,''असे चोप्रा म्हणाला.  

टॅग्स :आयपीएल २०२२रवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्ससुरेश रैनामहेंद्रसिंग धोनी
Open in App