Join us  

दुसऱ्या वनडेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, त्या प्रकरणात प्रशिक्षकांची सुरू झाली चौकशी, दोषी आढळल्यास होणार बरखास्त

Cricket South Africa: भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या वनडेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्याविरोधात झालेल्या वर्णभेदाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ वकील टेरी मोताऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 11:35 PM

Open in App

जोहान्सबर्ग - भारताविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या वनडेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्याविरोधात झालेल्या वर्णभेदाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ वकील टेरी मोताऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्क बाऊचरने सीएसएचे विद्यमाच संचालक ग्रॅमी स्मिथ आणि माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स यांच्यावर कृष्णवर्णीय खेळांडूंसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील माजी खेळाडू पॉल अॅडम्सने मार्क बाऊचरच्याविरोधात वर्णभेदाचे आरोप केले होते.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले की, जर स्वतंत्र तपासामध्ये जर बाऊचरला दोषी ठरवले गेले तर त्याला त्याच्या पदावरून बरखास्त केले जाऊ शकते. मात्र स्वतंत्र तपासामध्ये सर्व आरोपांचा तपास व्हायला पाहिजे. त्यानंतरच शिक्षेबाबत विचार केला जावा, असेही नमूद करण्यात आले आहे. आयोगाचे प्रमुख डुमिसा एनसेबेजा एससी यांनी २३५ पानांच्या रिपोर्टमधून ते निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचे संकेत दिले होते. या संदर्भात पुढील प्रक्रियेचे पालन केले पाहिजे.

सीएसएने सांगितले की, या भूमिकेला कायम ठेवत बोर्डाला एसजेएन रिपोर्टमध्ये दोषी आढळणारे सीएसएच्या कर्मचाऱ्यांना, पुरवठादारांना किंवा करारदारांच्याविरोधात पुढील औपचारिक तपासाची घोषणा करणे भाग होते. तसेच या प्रक्रियेतील हे पहिले पाऊल होते. सीएसएने सांगितले की, बाऊचरला १७ जानेवारी रोजी आरोपपत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये त्याच्याविरोधात शिस्तभंगाचे आरोप आणि अधिकारांचा उल्लेख केला होता.  

टॅग्स :द. आफ्रिकाआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App