Join us  

महिलांच्या कसोटी सामन्यात दिवसाला फेकावी लागतात १०० षटकं; जाणून घ्या ७ मोठे नियम

Womens Cricket vs Mens Cricket भारतीय महिला क्रिकेट संघानं आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 6:40 PM

Open in App

Womens Cricket vs Mens Cricket भारतीय महिला क्रिकेट संघानं आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पिंक कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात केली. २०२१मध्ये भारतीय महिला संघ दुसऱ्यांदा कसोटी सामना खेळत आहे. १४ वर्षांत दुसऱ्यांदाच भारतीय महिला संघ एकाच वर्षात दोन कसोटी सामने खेळत आहे. त्याउलट भारतीय पुरुष संघ वर्षाला जवळपास ८ ते १० कसोटी सामने खेळतात. पुरुष व महिला कसोटी क्रिकेटमधील ७ असे फरक जे तुम्हाला माहितही नसतील.

  • महिला क्रिकेट कसोटी सामना चार दिवसांचा असतो, तर पुरुषांचा कसोटी सामना पाच दिवस चालतो
  • महिला क्रिकेट कसोटी सामन्यात दिवसाला १०० षटकं फेकली जातात, तर पुरुषांना ९० षटकं फेकणे अनिवार्य असते
  • महिला क्रिकेट कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या चेंडूचं वजन १४२ ग्राम असायला हवं, तर पुरुष क्रिकेट कसोटीतील चेंडूचं वजन १५६ ग्राम असतं
  •  महिला कसोटी सामन्यात बाऊंड्रीचे अंतर कमीतकमी ५५ मीटर आणि जास्तीतजास्त ६४ मीटर असते. पुरुष कसोटी क्रिकेटमध्ये हेच अंतर ५९ ते ८२ मीटर असू शकते 

  • महिला क्रिकेट कसोटीत DRSचा वापर केला जात नाही, परंतु मैदानावरील अम्पायर तिसऱ्या अम्पायरची मदत घेऊ शकतात. पुरुष क्रिकेटमध्ये DRS वापरला जातो  
  • महिला क्रिकेटमध्ये एक षटक पूर्ण करण्यासाठी ३.६ मिनिटांचा कालावधी ठरवला आहे, तर पुरुषांना ४ मिनिटे दिली जातात
  • मैदानाबाहेर असलेल्या खेळाडूंच्या पेनल्टी वेळातही फरक आहे. महिलांसाठी कसोटी क्रिकेटमध्ये ११० मिनिटांचा, तर पुरुषांसाठी १२० मिनिटांचा आहे.
टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App