Join us  

Ben Stokes : 6,6,6,6,6,4,6,6; इंग्लंडचा नवा कर्णधार बेन स्टोक्सची आतषबाजी; कुटल्या 23 चेंडूंत 122 धावा! Video 

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) नुकतीच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदी नियुक्ती केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 5:38 PM

Open in App

6,6,6,6,6,4,6,6 by Ben Stokes in the last 8 balls in County - इंग्लंडचा कसोटी संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली नवी उंची गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) नुकतीच बेन स्टोक्सची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदी नियुक्ती केली. जो रूटच्या ( Joe Root) नेतृत्वाखाली इंग्लंडने अनेक यशस्वी मालिका जिंकल्या, परंतु मागील दोन-अडीच वर्षांत इंग्लंडची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. त्यामुळे ECB ने हा निर्णय घेतला. दुखापतीतून सावरल्यानंतर बेन स्टोक्सही आता मैदानावर परतला आहे आणि कौंटी क्रिकेटमध्ये त्याने शुक्रवारी तुफान फटकेबाजी केली. डरहॅम विरुद्ध वॉर्कस्टरशायर ( Worcestershire vs Durham ) या सामन्यात त्याच्या वादळी खेळीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

डरहॅमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेन स्टोक्सने आज शतकी खेळी साकारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या डरहॅमला अॅलेक्स ली ( 27) व सीन डिक्सन ( 104) यांनी दमदार सुरूवात करून दिली. या दोघांची अर्धशतकी भागीदारी संपुष्टात आल्यानंतर सीन डिक्सन व किगन पीटरसन यांनी शतकी धावा जोडल्या. किगन 50 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार स्कॉट बॉर्थिविकने ( 89) डिक्सनला साथ दिली. 104 धावा करून डिक्सन माघारी परतला आणि स्कॉटही 89 धावांवर बाद झाला. त्यामुळे डरहॅमच्या 4 बाद 360 धावा झाल्या होत्या. तेव्हा बेन स्टोक्स व डेव्हिड बेडींगहॅम यांनी तुफान फटकेबाजी केली.

डेव्हिड व बेन यांनी जवळपास दोनशे धावांची भागीदारी केली आहे. डेव्हिडने 155 चेंडूंत 14 चौकार व 1 षटकारासह नाबाद 118 धावा केल्या आहेत. बेन 80 चेंडूंत 142 धावांवर खेळतोय. त्याने या खेळीत 8 चौकार व 15 षटकार खेचले आहेत. त्याने मागील 8 चेंडूंत 6,6,6,6,6,4,6,6 अशी आतषबाजी केली.   

टॅग्स :बेन स्टोक्सइंग्लंडकौंटी चॅम्पियनशिप
Open in App