आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा इंग्लंडच्या संघाच्या नावे आहे. २०२२ मध्ये नेदरलंड्स विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडनं ४ विकेट्सच्या मोबदल्यात ४९८ धावा केल्या होत्या. ५०० चा डाव फक्त दोन धावांनी हुकला होता. पण आता ५० षटकाच्या सामन्यात एका संघाने साडे पाचशेपेक्षा अधिक धावा करत क्रिकेट जगताचं लक्षवेधून घेतलं आहे. यात ABD नं द्विशतकी खेळीसह खास छाप सोडलीये. आता AB डिव्हिलियर्स नाही तर तो ज्या संघाने विक्रमी धावसंख्या केली त्या सेलांगोर (Selangor) संघातील प्रमुख फलंदाज आहे. एक नजर टाकुयात नेमकं या संघाने कुणाविरुद्ध आणि कोणत्या स्पर्धेत कुटल्या विक्रमी धावसंख्या त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एक द्विशतक अन् ३ अर्धशतके! वनडे सामन्यात ५६४ धावा
क्रिकेटच्या मैदानातील ही कामगिरी मलेशिया क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १९ पुरुष संघातील ५० षटकांच्या इंटर स्टेट चॅम्पियनशिप २०२५ च्या साखळी फेरीतील सामन्यात मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. सेलांगोर (Selangor) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पुत्राजया (Putrajaya) संघातील गोलंदाजांची चांगली धुलाई केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना या संघाकडून मुहम्मद अकरम एबीडी मलिक नावाच्या युवा बॅटरनं फक्त ९७ चेंडूत २१७ धावा केल्या. त्याची ही इनिंग ११ चोकार आणि २३ षटकारांनी बहरलेली होती. याशिवाय मुहम्मद असरफ ७२ धावा, अब्दुल हैजद ६५ धावा आणि नागिनेश्वरन यानी ५३ धावा अर्धशतके झळकावली. या जोरावर सेलांगोर संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ५६४ धावा केल्या होत्या.
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
५६५ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना ८७ धावांवर आटोपला पुत्राजया (Putrajaya) संघ
डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पुत्राजया (Putrajaya) संघ २१.५ षटकात अवघ्या ८७ धावांवर आटोपला. त्यामुळे सेलांगोर संघाने हा सामना ४७७ धावांनी जिंकला. प्रतिस्पर्धी संघातील एकही बॅटर ३० या धावसंख्येपर्यंत पोहचू शकला नाही. दानिश उकेल ४९ चेंडूत २६ धावा आणि शारिक अकलान याने २५ चेंडूत १९ धावा वगळता अन्य कुणालाही दुहेर आकडा गाठता आला नाही. याशिवाय चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
Web Title : सेलांगोर ने अंडर-19 मैच में 564 रन बनाए, 477 से जीत!
Web Summary : सेलांगोर की अंडर-19 टीम ने 50 ओवर के मैच में 564 रन बनाए, जिसमें मुहम्मद अकरम के 217 रन शामिल थे। पुत्रजया 87 रनों पर ऑल आउट हो गई। मलेशिया क्रिकेट एसोसिएशन के इंटर-स्टेट चैम्पियनशिप 2025 लीग मैच में सेलांगोर ने 477 रनों से जीत हासिल की।
Web Title : Selangor Scores 564, Wins by 477 in Under-19 Match!
Web Summary : Selangor's Under-19 team achieved a massive 564 runs in a 50-over match, fueled by Muhammad Akram's 217. Putrajaya was all out for 87. Selangor won by 477 runs in the Malaysia Cricket Association's Inter-State Championship 2025 league match.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.