नवी दिल्ली : आयपीएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंड व आॅस्ट्रेलियाच्या २१ खेळाडूंना ब्रिटनमधून परतल्यावर सहा दिवसांऐवजी फक्त ३६ तास विलगीकरणात रहावे लागणार आहे.
हे खेळाडू ब्रिटनमधून एकदिवसीय मालिका खेळून येतील. त्यामुळे त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी कमी करण्याची मागणी बीसीसीआयने यूएईच्या संबंधित विभागाकडे केली. आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (वृत्तसंस्था)