Join us  

2 New IPL Teams in 2022 : विक्रमी किमतीत फ्रँचायझी खरेदी करणारे RPSG Group आणि CVC Capital आहेत तरी कोण?; जाणून घ्या त्यांच्या संपत्तीबद्दल

New IPL Teams in IPL 2022: दोन नव्या संघांच्या समावेशामुळे IPL 2022 साठी Mega Auction होणार आहे आणि त्याची तारीख, नियम इत्यादी माहिती बीसीसीआय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१मध्ये दुबईत हे ऑक्शन पार पडण्याची शक्यता अधिक आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 8:43 PM

Open in App

New IPL Teams in IPL 2022: RPSG Group of Sanjiv Goenka and CVC Capital : संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये  ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत.  RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली.  दोन नव्या फ्रँचायझींसाठी १० स्पर्धेत शर्यतीत होते. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.(The BCCI gets a whooping 12,690cr (1.7 Billion dollars) from the sale of 2 New IPL Teams.)

दोन नव्या संघांच्या समावेशामुळे IPL 2022 साठी Mega Auction होणार आहे आणि त्याची तारीख, नियम इत्यादी माहिती बीसीसीआय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१मध्ये दुबईत हे ऑक्शन पार पडण्याची शक्यता अधिक आहे.   

जाणून घेऊया नव्या फ्रँचायझीबद्दल

  • RP संजीव गोएंका यांची एकूण संपत्ती ही ६ बिलियन अमेरिकन डॉलर आणि उत्पन्न ४ बिलियन अमेरिकन डॉलर इतके आहे. हा भारतातील सर्वात जलद वाढणारा समुह आहे. विज व ऊर्जा निर्मितीसह हा समुह कार्बन ब्लॅक उत्पादन, रिटेल, आयटी  सेक्टर, FMCG, media, entertainment आणि agriculture या विभागातही गुंतवणुकदार आहे. २०२०मध्ये त्यांनी २६,९०० कोटी महसूल कमावला आहे. या समुहात ५० हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात, तर कोट्यवधी भागधारक आहेत.  
  • संजीव गोएंका हे Confederation of Indian Industries (CII) आणि All India Management Institute (AIMA) चे माजी अध्यक्ष होते. शिवाय ते Prime Minister’s Council on Trade & Industryचे सदस्य आहेत.   
  • CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. 

 

बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला काय म्हणाले?बीसीसीआय आणि क्रिकेट विश्वासाठी लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या संघाच्या येण्यानं मोठा फायदा होणार आहे. हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे. उत्तर प्रदेशला आणि अहमदाबाद यांना पहिला आयपीएल संघ मिळणार आहे. तेथे सर्वोत्तम स्टेडियम आहेत, असे राजीव शुक्ला म्हणाले.  

टॅग्स :आयपीएल २०२१अहमदाबादलखनऊ
Open in App