Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG : हॉटेलचे दोन स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; सामनाच करावा लागला रद्द

सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी हॉटेल स्टाफमधील दोन सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

By स्वदेश घाणेकर | Updated: December 6, 2020 13:06 IST

Open in App

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वन डे सामना कोरोन पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे पुढे ढकलण्यात आला होता. तो सामना आज होणे अपेक्षित आहे, परंतु सामना सुरू होण्यास आता विलंब होणार आहे. सामन्यापूर्वी खेळाडू थांबलेल्या हॉटेलमधील दोन स्टाफ सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इंग्लंडचे खेळाडू व व्यवस्थापनाच्या सदस्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यांच्या रिपोर्टनंतर सामना सुरू होईल, अशी माहिती इंग्लंड-वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली. पण, ताज्या माहितीनुसार हा सामना रद्दच करण्यात आला आहे.  क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही ECBची विनंती मान्य केली आहे.  

टॅग्स :इंग्लंडद. आफ्रिकाकोरोना वायरस बातम्या