Join us
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षे विश्वचषक क्रिकेट : कांगारूंविरुद्ध आज भारताची सलामी

भारतीय क्रिकेटचे भावी स्टार्स आयसीसी वन डे अंडर १९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत. ‘गुरू’राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात संघ सज्ज असून अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंचा संघात समावेश आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:54 IST

Open in App

माऊंट माऊंगानुह : भारतीय क्रिकेटचे भावी स्टार्स आयसीसी वन डे अंडर १९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आज रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत. ‘गुरू’राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात संघ सज्ज असून अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंचा संघात समावेश आहे. भारतीय संघ अनेक दिवसांआधी येथे दाखल झाल्यामुळे येथील हवामानाशी एकरूप झाला आहे.भारताने तीन वेळा विजेतेपदाचा मान मिळविला. याआधी २०१४ मध्ये भारत विश्वविजेता बनला होता. या संघातील कुण्या एका खेळाडूच्या तयारीवर द्रविड यांचे लक्ष नव्हते. त्यांनी सांघिक कामगिरीवर भर दिला आहे. तरीही पृथ्वी शॉ हाच फलंदाजीचा आधारस्तंभ असेल. हिमांशु राणा, पंजाबचा शुभमान गिल, अनुकूल रॉय आणि अभिषेक शर्मा हे धावसंख्येला आकार देण्यात सक्षम मानले जातात. बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल याच्यावर विशेष लक्ष असेल. त्याला शिवम मावी साथ देणार आहे.शॉ संघाच्या तयारीवर आनंदी आहे. गेल्या आठवड्यात भारताने येथे काही सराव सामने खेळले.

टॅग्स :क्रिकेट