T20 WC साठी २० पैकी १९ देशांनी संघ केले जाहीर; पाकिस्तानचं अजून काही ठरेना

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत आणि १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 07:43 PM2024-05-16T19:43:01+5:302024-05-16T19:45:05+5:30

whatsapp join usJoin us
19 out of 20 teams have announced their squads for the ICC Men’s T20 World Cup 2024, Pakistan Yet to be announced | T20 WC साठी २० पैकी १९ देशांनी संघ केले जाहीर; पाकिस्तानचं अजून काही ठरेना

T20 WC साठी २० पैकी १९ देशांनी संघ केले जाहीर; पाकिस्तानचं अजून काही ठरेना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

All squads named so far for ICC Men's T20 World Cup 2024 - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २० संघ सहभाग घेणार आहेत आणि १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा पार पडणार आहे. या रणसंग्रामासाठी २९ एप्रिलला न्यूझीलंडने संघ जाहीर केला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा तो पहिला संघ ठरला. आतापर्यंत १९ संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत आणि पाकिस्तान हा एकमेव देश आहे की ज्यांना अद्याप काही ठरवता आलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १ मे ही संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख होती, परंतु २५ मे पर्यंत सहभागी देशांना संघात बदल करता येणार आहे. पाकिस्तानचा संघ त्याच मुहूर्ताची वाट पाहत असल्याचे समजतेय. आयर्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत त्यांनी जरी बाजी मारली असली तरी आयर्लंडने एक सामना जिंकून पाकिस्तानला त्यांच्या कमकुवत बाबी दाखवून दिल्या आहेत.


अफगाणिस्तान: राशिद खान, रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी , फरीद अहमद मलिक. राखीव: सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी


ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श, ॲश्टन आगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा


बांग्लादेश : नजमुल हुसेन शांतो, तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तन्झिद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह रियाद, जाकेर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब. प्रवासी राखीव: अफिफ हुसेन, हसन महमूद


कॅनडा: साद बिन जफर, आरोन जॉन्सन, दिलॉन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किर्तन, परगट सिंग, रविंदरपाल सिंग, रायनखान पठाण. राखीव: तजिंदर सिंग, आदित्य वर्धराजन, अममार खालिद, जतिंदर मथारू, परवीन कुमार


इंग्लंड संघ: जॉस बटलर, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोप्ली, मार्क वुड


भारत: रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव: शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान


आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (सी), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग 
नामिबिया: गेर्हार्ड इरास्मस (सी), झेन ग्रीन, मायकेल व्हॅन लिंजेन, डायलन लीचर, रुबेन ट्रम्पेलमन, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो, टांगेनी लुंगामेनी, निको डेव्हिन, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, जेपी कोटझे, डेव्हिड विसे, बर्नार्ड शॉल्ट्ज, मालन क्रुगर , पीडी ब्लिग्नॉट


नेपाळ : रोहित पौडेल, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुर्तेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमल सिंग आयरी


नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स, आर्यन दत्त, बास डी लीडे, डॅनियल डोरम, फ्रेड क्लासेन, लोगान व्हॅन बीक, मॅक्स ओ'डॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, ⁠ टिम प्रिंगल, विक्रम सिंग , व्हिव्ह किंगमा, वेस्ली बॅरेसी. प्रवास राखीव: काइल क्लेन


न्यूझीलंड: केन विल्यमसन, फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी . ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : बेन सियर्स


ओमान: आकिब इलियास, झीशान मकसूद, कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, अयान खान, शोएब खान, मोहम्मद नदीम, नसीम खुशी, मेहरान खान, बिलाल खान, रफीउल्ला, कलीमुल्ला, फय्याज बट, शकील अहमद, खालिद कैल. राखीव: जतिंदर सिंग, समय श्रीवास्तव, सुफयान मेहमूद, जय ओडेद्रा


पापुआ न्यू गिनी: असाडोल्ला वाला, अले नाओ, चाड सोपर, सीजे अमिनी, हिला वारे, हिरी हिरी, जॅक गार्डनर, जॉन कारीको, काबुआ वागी मोरिया, किपलिंग डोरिगा, लेगा सियाका, नॉर्मन वानुआ, सेमा कामिया, सेसे बाऊ, टोनी उरा
 
पाकिस्तान : अजून घोषणा व्हायची आहे

स्कॉटलंड: रिची बेरिंग्टन, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅड करी, ख्रिस ग्रीव्हज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, सफियान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीयर, मार्क वॉट, ब्रॅड व्हील 

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिबेझ शम्सी स्टब्स


श्रीलंका: वानिंदू हसरंगा, चारिथ असलंका, कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समराविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शानाका, धनंजया डी सिल्वा, महेश थेक्षाना, दुनिथ वेललागे, दुष्मंथाना चमेरा, नुशमंथरा थिल्शाना, ड्युनिथ वेललागे, नुष्मंथेरा चमेरा, डी. मधुशंका. प्रवासी राखीव जागा: असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे, जनिथ लियानागे.


युगांडा: ब्रायन मसाबा,सायमन सेसाझी, रॉजर मुकासा, कॉस्मास क्यूउटा, दिनेश नाक्रानी, ​​फ्रेड अचेलम, केनेथ वायस्वा, अल्पेश रामजानी, फ्रँक न्सुबुगा, हेन्री सेन्योन्डो, बिलाल हसुन, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली मियाजी शाह, जुमाजी पटेल . प्रवासी राखीव: निर्दोष धन्यवाद, रोनाल्ड लुटाया

अमेरिका : मोनाक पटेल, आरोन जॉन्स, एड्रीएस गौस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेस्सी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोश्तुश केनजीगे, सौरभ नेत्रावळकर, शाडली व्हॅन स्चूकवाक, स्टीव्हन टेलर, शयन जहांगीर. राखीव - गजानंद सिंग, जुआनोय ड्रायडेल, यासीर मोहम्मद  


वेस्ट इंडीज: रोव्हमन पॉवेल, अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड

Web Title: 19 out of 20 teams have announced their squads for the ICC Men’s T20 World Cup 2024, Pakistan Yet to be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.