Join us  

प्रथम श्रेणीतील भारताचा हा विक्रम अजून दूरच!

शतकांच्या शतकापासून फलंदाज वंचित : इंग्लंंडच्या २१ फलंदाजांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:24 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा एकमेव भारतीय फलंदाज म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला शतकांचे शतक रचता आलेले नाही.दुसरीकडे, या विक्रमात इंग्लंडच्या सर्वाधिक फलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्या २१ फलंदाजांनी ही किमया साधली आहे. या विक्रमापासून भारतीय अजून दूरच आहेत. तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकाविली आहेत. १६ मार्च २०१२ मध्ये त्याने आपले १०० वे शतक पूर्ण केले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८१ शतके आहेत. या यादीत त्याने सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी साधलेली आहे. गावस्कर यांच्या नावावरही ८१ शतके आहेत. प्रथम श्रेणी, अ विभागीय, टी-२० अशा तिन्ही प्रकार मिळून सचिनच्या नावावर १४२ शतके होतात मात्र केवळ प्रथम श्रेणीत त्याचा हा विक्रम होऊ शकला नाही. प्रथम श्रेणी सामन्यांत सर्वाधिक शतक झळकाविण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॅक हाब्स याच्या नावावर आहे. त्याने १९९ शतके ठोकली आहेत.(वृत्तसंस्था)भारतातील पहिला प्रथम श्रेणी सामना१८६४ मध्ये मद्रास आणि कोलकाता यांच्यात देशातील पहिला प्रथम श्रेणी सामना खेळविण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत केवळ ९ फलंदाजांना ५० हून अधिक शतके पूर्ण करता आलीत. यात केवळ चेतेश्वर पुजारा खेळत आहे. इतर निवृत्त झाले. पुजाराच्या नावावर ५० शतके असून ३२ वर्षीय हा खेळाडू १५ वर्षांत या विक्रमापर्यंत पोहचू शकला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात आतापर्यंत ७० शतके झळकाविली आहेत. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर केवळ ३४ शतके आहेत. अजिंक्य रहाणे (३३), शिखर धवन (२५) आणि रोहित शर्मा (२३) यांचा समावेश आहे.यांचे शतकांचे अर्धशतकप्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ज्या भारतीय फलंदाजांनी शतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे त्यात सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर (दोघांची ८१), राहुल द्रविड (६८), विजय हजारे (६०), वसीम जाफर (५७), दिलीप वेंगसरकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (दोघांची ५५), मोहम्मद अझरुद्दीन (५४) आणि पुजारा (५०) यांचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रथम श्रेणी शतकेआंतरराष्ट्रीयस्तरावर प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात १०० हून अधिक शतके झळकाविण्याच्या विक्रमात इग्लंडच्या २१ फलंदाजांचा समावेश आहे. हा विक्रम २५ फलंदाजांना करता आला. शतकांचे शतक पूर्ण करणारे पहिले फलंदाज म्हणून डब्ल्यूजी ग्रेस यांचे नाव आहे. त्यांनी ३० मे १८९५ मध्ये हा विक्रम रचला. य विक्रमात आॅस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन (११७), वेस्ट इंडिजचे विव रिचर्डस् (११४), पाकिस्तानचे जहीर अब्बास (१०८) आणि न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नर (१०३) यांचा समावेश आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकर