New Zealand vs India 1st Test :  Rishabh Pant’s run out is the first time Ajinkya Rahane has involved in a run out dismissal in his Test career of 63 Test matches | NZ vs IND, 1st Test : अजिंक्य रहाणेकडून प्रथमच झालेली 'चूक' टीम इंडियाला महागात पडणार? 

NZ vs IND, 1st Test : अजिंक्य रहाणेकडून प्रथमच झालेली 'चूक' टीम इंडियाला महागात पडणार? 

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : टीम साऊदी आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांनी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवावा लागला आणि त्यावेळी टीम इंडियाचे 5 शिलेदार 122 धावांवर माघारी परतले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, तेव्हा अजिंक्य रहाणेवर भिस्त होती. पण, साऊदीनं टीम इंडियाच्या शिलेदारांना हाराकिरी पत्करण्यास भाग पाडले. भारताचा उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी परतला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांत. टीम इंडियाच्या पहिल्या डावात रहाणेकडून एक चूक झाली आणि ती टीम इंडियाला महागात पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 

भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करून न्यूझीलंडनं डाव खेळला. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून किवींना डाव साध्य करण्यास जणू हातभार लावला. पृथ्वी शॉ ( 16), मयांक अग्रवाल ( 34), चेतेश्वर पुजारा ( 11), कर्णधार विराट कोहली ( 2) आणि हनुमा विहारी ( 7) हे आघाडीचे पाच फलंदाज झटपट माघारी परतले. उप कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मदार होती, परंतु दुसऱ्या दिवशी त्यानेही निराश केले. बाद होण्यापूर्वी रहाणेनं चुकीचा कॉल दिल्यानं रिषभ पंत ( 19) धावबाद झाला. साऊदीनं रहाणेला बाद केले. रहाणेनं 138 चेंडू खेळून 46 धावा केल्या.

पंत धावबाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर साऊदीनं अप्रतिम यॉर्कर टाकून आर अश्विनचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमीनं 20 चेंडूंत 21 धावा करून टीम इंडियाच्या धावसंख्येत भर घातली. साऊदीनं 49 धावांत 4, तर जेमिसननं 39 धावांत 4 फलंदाज बाद केले. भारताचा पहिला डाव 68.1 षटकांत 165 धावांवर गडगडला. डावाच्या 59व्या षटकांत रहाणेकडून चूक झाली. साऊदीच्या गोलंदाजीवर एक धाव घेण्याच्या नादात त्याच्याकडून पंत धावबाद झाला. 63 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत प्रथमच सहकारी फलंदाजाला धावबाद करण्याचा ठपका रहाणेच्या नावावर आज बसला. 

 

English summary :
Ajinkya Rahane's stand today with Rohit Sharma was his 200th partnership in Tests without ever being involved in a run out. A world record at the moment. In his 61 Tests career, neither him nor his partner has been run out

Web Title: New Zealand vs India 1st Test :  Rishabh Pant’s run out is the first time Ajinkya Rahane has involved in a run out dismissal in his Test career of 63 Test matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.