Netizens trolled Irfan Pathan on his religion, Indian ex bowler give epic reply to them svg | लाजीरवाणा प्रकार; समाजकार्य करणाऱ्या इरफान पठाणवर नेटिझन्सकडून टीका 

लाजीरवाणा प्रकार; समाजकार्य करणाऱ्या इरफान पठाणवर नेटिझन्सकडून टीका 

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व क्षेत्रातील सेलिब्रेटी पुढे आले आहेत. पण, इरफान आणि युसूफ पठाण यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. पठाण बंधुंनी सुरुवातीला स्थानिक हॉस्पिटल्सना 4000 माक्सचं वाटप केलं. सोमवारी त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकताना गरजूंसाठी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला. पण, समाजकार्य करून देशसेवा करणाऱ्या इरफानवर काही नेटिझन्सनी धर्मावरून टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत देशातील क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग यांच्यासह मेरी कोम, हिमा दास, पी व्ही सिंधू यांनीही रविवारी दिवा पेटवून मोदींच्या आवाहनला साथ दिली. इरफाननेही त्यात सहभाग घेतला, परंतु काही लोकांनी फटाके फोडल्यानं त्यानं नाराजी व्यक्त केली.


लोकं फटाके वाजवण्यापूर्वी सर्व काही चांगलं होतं, अशा शब्दात इरफाननं नाराजी प्रकट केली. त्यावरून त्याला काही समाजकंटकांनी ट्रोल केले. त्यावरही इरफाननं त्यांना प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.

Web Title: Netizens trolled Irfan Pathan on his religion, Indian ex bowler give epic reply to them svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.