Mumbai-born cricketer ejaz patel to play in New Zealand Test team vs India | मुंबईत जन्मलेला क्रिकेटपटू न्यूझीलंडच्या कसोटी संघात, भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

मुंबईत जन्मलेला क्रिकेटपटू न्यूझीलंडच्या कसोटी संघात, भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठीच्या संभाव्य संघात मुंबईत जन्मलेल्या एका खेळाडूची न्यूझीलंडच्या संघात निवड करण्यात आली आहे. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण...

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यातच आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

Image result for ejaz patel

न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने पुनरागमन केले आहे. तसेच न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज कायल जेमिन्सनला संधी दिली असून फिरकीपटू मिशेल सॅन्टनरला संघातून वगळण्यात आले आहे.

न्यूझीलंडच्या या संघात फिरकीपटू मुंबईत जन्मलेल्या एजाझ पटेलला संधी देण्यात आली आहे. संघात त्याच्या व्यक्तीरीक्त दुसरा कोणताही फिरकी गोलंदाज दिसत नाही. कारण मिचेल सँटनरला वगळून पटेलला या संघात स्थान देण्यात आले आहे. सहा महिन्यानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याला संधी दिली होती. पण त्यानंतर आतापर्यंत त्याने एकही सामना खेळलेला नाही.

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातला सराव सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील हाराकिरीनंतर टीम इंडियानं गोलंदाजांच्या जोरावर सामन्यात कमबॅक केले. पहिल्या डावातील 28 धावांच्या आघाडीत टीम इंडियानं तिसऱ्या दिवशी 4 बाद 252 धावा करताना सामना अनिर्णित राखला आहे.

Image result for ejaz patel


भारत आणि न्यूझीलंड यांचे संभाव्य संघ असे आहेत...

भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

न्यूझीलंडचा कसोटी संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग,नील वॅग्नर
 

Web Title: Mumbai-born cricketer ejaz patel to play in New Zealand Test team vs India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.