MS Dhoni Said He will Play Till Hes Beating Teams Fastest Sprinter says Sanjay Manjrekar | तोपर्यंत खेळत राहीन, असे धोनी म्हणाला होता-मांजरेकर

तोपर्यंत खेळत राहीन, असे धोनी म्हणाला होता-मांजरेकर

मुंबई : ‘जोपर्यंत संघातील सर्वांत वेगवान धावणाऱ्या खेळाडूला मागे टाकत राहीन तोपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत:ला फिट समजेन,’ असे महेद्रसिंग धोनीने माझ्याशी बोलताना म्हटले होते,’ असा दावा समालोचक संजय मांजरेकर यांनी केला आहे. दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीसोबत २०१७ ला भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या लग्न समारंभात चर्चा झाली होती, असे मांजरेकरांनी सांगितले.

‘विराटच्या लग्नसोहळ्यात मी आणि धोनी बोलत होतो. ‘जोपर्यंत सर्वांत वेगवान खेळाडूला धावण्यात मागे टाकत राहीन तो पर्यंत स्वत:ला फिट समजून क्रिकेट खेळत राहीन,’ असे धोनी म्हणाला होता. आयपीएलसाठी धोनी सज्ज होत आहे. तो चांगली कामगिरी करेल, यात शंका नाही. निवडक गोलंदाजांविरुद्ध धोनीला सावध रहावे लागेल.’ (वृत्तसंस्था)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MS Dhoni Said He will Play Till Hes Beating Teams Fastest Sprinter says Sanjay Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.