मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पण तरीही धोनीच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. धोनी निवृत्ती घेणार की नाही, कधीपर्यंत खेळणार... या साऱ्या गोष्टी सुरु असताना धोनीबद्दल एक अनोखी गोष्ट पुढे आली आहे.

धोनीला त्याचे चाहते लाडाने माही म्हणून हाक मारतात. पण धोनीची पत्नी साक्षी धोनीला लाडाने कोणत्या नावाने हाक मारते, हे तुम्हाला माहिती नसेल. पण सध्याच्या घडीला एक व्हिडीओ चांगलाच वायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये साक्षी ही धोनीला खास नावाने हाक मारताना दिसत आहे.

एका पंचतारांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये धोनी हॉटेलमधून जिन्याने खाली येताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी खाली येत असताना त्याच्या हातामध्ये आणि खांद्यावर बॅग्स आहेत. धोनी जेव्हा जिने उतरत होता तेव्हा साक्षीने लडिवाळपणे त्याला हाक मारली होती. पण धोनीने यावेळी तिची हाक ऐकूनही तिला न ऐकल्यासारखे केले.

Image result for dhoni and sakshi love pic

धोनी त्यानंतर आपल्या सामानाकडे जाऊन हॉटेलमधील स्टाफबरोबर काही गोष्टी उरकून घेत होता. साक्षी धोनीच्या पाठोपाठ तिथेही गेली. सुरुवातीला साक्षीने धोनीला स्विटी या टोपण नावाने हाक मारत होती. पण धोनी आपल्याकडे पाहत नाही हे बघितल्यावर तिने स्विटीबरोबर क्यूटी असेही धोनीला म्हटले.

Related image

Related image

Web Title: MS Dhoni pet name taken by his wife sakshi; You will also be amazed by the viral video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.