Harbhajan Singh Virat Kohli Fans: भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग रोखठोक विधानांसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या ताज्या मुलाखतीत काही अशी विधाने केली आहेत, ज्याने विराट कोहलीचे चाहते संतापले आहेत. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विराट कोहलीचे लाखो चाहते आहेत. हरभजन सिंगने केलेल्या विधानांमध्ये विराट कोहलीचे नाव घेण्यात आलेले नाही. पण अप्रत्यक्षपणे विराट कोहलीवर आणि त्याच्या चाहत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
शनिवारी (१७ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यादरम्यान हरभजन सिंग आणि आकाश चोप्रा हे दोन समालोचक मुलाखतीदरम्यान महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबद्दल चर्चा करत होता. यावेळी हरभजन सिंगने विराट कोहलीचे नाव न घेता त्याच्यावर टीका केल्याचा दावा विराटने चाहते करताना दिसत आहेत.
हरभजन सिंग काय म्हणाला?
पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यादरम्यान, धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबद्दल चर्चा झाली. यादरम्यान, हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले, "जर धोनीला आणखी खेळावेसे वाटत असेल तर त्याने नक्की खेळावे. जर धोनी माझ्या संघाचा खेळाडू असता तर मी त्याच्या भूमिकेबाबत वेगळा निर्णय घेतला असता. धोनी त्याला हवे तितके दिवस खेळू शकतो. त्याच्या चाहत्यांनाही वाटते की त्याने आणखी खेळावे. धोनीचा 'चाहता वर्ग' खराखुरा आहे, तर इतर खेळाडू पैसे देऊन चाहते गोळा करतात आणि PR वर अवलंबून असतात.” हरभजनच्या विधानानंतर आकाश चोप्रा हसू लागला आणि म्हणाला, "एवढं खरं सांगायचं नसतं." त्यावर भज्जी न डगमगता म्हणाला, “कोणीतरी सत्य सांगायला हवेच असते.” घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला.
हरभजन सिंगच्या या कमेंटवर सोशल मीडियावर लोक संतापले. चाहत्यांनी असेही म्हटले की हरभजनने विराट कोहलीचे नाव न घेता त्याला लक्ष्य केले आहे. तसेच, विराटचे किंवा RCB चे चाहते अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत असल्याचेही काही युजर्सने सोशल मीडियावर लिहिले.
Web Title: ms dhoni ipl future plans harbhajan singh trolls virat kohli paid fans rcb ipl 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.