भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा क्रिकेटच्या मैदानातील आपल्या शांत स्वभावामुळे 'कॅप्टन कूल' या नावाने ओळखला जातो. ज्या नावासह लोकप्रियता लाभली त्या नावावर अधिकार दाखवण्यासाठी MS धोनीनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिग्गज क्रिकेटरनं 'कॅप्टन कूल' या नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला आहे. धोनीच्या वकिलांनी देखील या वृत्ताला दुजारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
... तर धोनीशिवाय अन्य कुणालाही वापरता येणार नाही 'कॅप्टन कूल' हे नाव
महेंद्रसिंह धोनीनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खास छाप सोडली आहे. २००७ ची पहिली वहिली टी वर्ल्ड कप स्पर्धा, २०११ वनडे वर्ल्ड कप आणि २०१७ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. आपल्या कारकिर्दीत शांत डोक्याने आश्चर्यकारक निर्णय घेणाऱ्या धोनीला 'कॅप्टन कूल' या नावाने ओळख मिळाली. या नावावर अधिकार गाजवण्यासाठी धोनीनं ५ जूनला ट्रेडमार्क नोंदणीकृत पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. जर धोनीला ट्रेंडमार्क मिळाला तर अन्य कोणालाही या नावाचा वापर करता येणार नाही.
'चायनामन' खरंच टीम इंडियासाठी फायद्याचा ठरु शकतो का? इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड भारी, पण...
धोनी आधी एक अर्ज आला अन् बाद ठरला
धोनीनं हा निर्णय घेण्याआधी प्रभा स्किल स्पोर्ट्स (OPS) प्रायव्हेट लिमिटेडकडून जुलै २०२१ मध्ये 'कॅप्टन कूल' ट्रेंडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता. पण हा अर्ज बाद ठरवल्यानंतर या नावावर अधिकार गाजवण्यासाठी धोनीचा मार्ग मोकळा झालाय.
धोनीच्या कारकिर्दीतील खास गोष्टी
महेंद्रसिंह धोनीनं यशस्वी कर्णधारासह एक सर्वोत्तम फिनिशर आणि विकेट किपरच्या रुपात आपली छाप सोडली आहे. धोनी आपल्या कारकिर्दीत विकेटमागे १९५ स्टंपिंग्स केले आहेत. याशिवाय आपल्या कारकिर्दीत धोनी ८ वेळा आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयरचा भाग राहिला. या दोन्ही वर्ल्ड रेकॉर्डशिवाय आयपीएलमध्येही त्याने विक्रमी ५ वेळा जेतेपद जिंकल्याचा खास रेकॉर्ड आहे.
Web Title: MS Dhoni Files For Trademark Of Iconic Nickname Captain Cool
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.