मुंबई : बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारामधून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले आणि त्यानंतर एकच गहजब झाला. कारण धोनीचे चाहते यावेळी चांगलेच निराश झालेले पाहायला मिळाले. या वार्षिक कराराची घोषणा करताना बीसीसीआयने धोनीला वगळले आहे. पण तरीही धोनी पुन्हा बीसीसीआयच्या करारामध्ये सामील होऊ शकतो. त्यासाठी त्याला फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे.

Related image

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केलेल्या करारातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले. करारामध्ये धोनीचे नाव नसल्यानं पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला. हा धोनी पर्वाचा अंत समजावा का? बीसीसीआयच्या या सेंट्रल कराराचा नक्की अर्थ काय? असे बरेच प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सैन्यदलाच्या सेवेतही रुजू झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला सेंट्रल करारातून वगळण्यात आले. पण धोनीने फक्त एक गोष्ट केली की, त्याला पुन्हा एकदा बीसीसीआय आपल्या करारामध्ये सामील करून घेऊ शकते.

Related image

बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

Related image
Related image

या विश्वचषकापूर्वीही धोनी आपल्याला बीसीसीआयच्या कराराच्या यादीत दिसू शकतो. धोनी जर ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी खेळला तर बीसीसीआयला धोनीला आपल्या करारामध्ये सामील करून घ्यावे लागेल. यासाठी बीसीसीआयने एक तरतूद केलेली आहे. धोनी जर विश्वचषकापूर्वी खेळला तर त्याला 'प्रो-रेटा' या तत्वावर बीसीसीआयच्या करारामध्ये सामील करण्यात येऊ शकते.

Related image

गतवर्षी धोनीचा करारात ए ग्रेडमध्ये समावेश होता. यावर्षी धोनीला करारामध्ये सी ग्रेडमध्येही स्थान दिलेले नाही. या करारामधून वगळल्यानंतरही धोनी अजून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकतो. धोनीने अजूनही निवृत्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याचे नाव करारात नसले तरी तो खेळू शकतो.

Image result for dhoni happy

धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल. धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही.

Related image

Web Title: MS Dhoni can rejoin the BCCI contract, the only thing that has to be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.