Michael Vaughan unhappy with Ravindra Jadeja's BCCI contract, wants him in same category as Virat Kohli | रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे; इंग्लंडच्या माजी कर्णधाराची करारावर नाराजी

रवींद्र जडेजाला बीसीसीआयनं विराट कोहली इतके मानधन द्यायला हवे; इंग्लंडच्या माजी कर्णधाराची करारावर नाराजी

बीसीसीआयनं २०२०-२१ या वर्षांकरीता त्यांच्या कराराची घोषणा केली आणि त्यात त्यांनी A + कॅटेगरीत विराट कोहली, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा या टीम इंडियाच्या तीन प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले. बीसीसीआयच्या करारानुसार या तिघांनी वर्षाला ७ कोटी इतका पगार दिला जाणार आहे. टी नटराजन याचे नाव या करारात नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु नटराजनकडे फक्त १ कसोटीचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची करारासाठी निवड झाली नाही. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याचा A कॅटेगरीत समावेश केल्यानं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेला वॉन ( Former England captain Michael Vaughan) यानं नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार! 

जडेजा हा टीम इंडियाच्या तिनही फॉरमॅटमधील संघाचा नियमित सदस्य आहे आणि त्याला अन्य ९ सहकाऱ्यांसह A कॅटेगरीत ठेवले गेले आहे. या कॅटेगरीत आर.अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश असून त्यांना वर्षाला ५ कोटी मानधन दिले जाणार आहे.  

वॉन यानं बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यानं ट्विट केलं की, जडेजाला विराट कोहलीप्रमाणे A+ कॅटेगरीत स्थान मिळायला हवं होतं. कोहलीनंतर तो टीम इंडियाचा मोठा खेळाडू आहे. 

A + ( ७ कोटी) : विराट कोहली. जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा 
A ( ५ कोटी) :  आर.अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या 
B ( ३ कोटी) :  वृद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयांक अग्रवाल 
C ( १ कोटी ) : कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Michael Vaughan unhappy with Ravindra Jadeja's BCCI contract, wants him in same category as Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.