MI vs RR Latest News : Turning Point; Hardik Pandya drops a catch off Krunal Pandya's ball, Ben Stokes survives, Video | MI vs RR Latest News : हार्दिक पांड्यानं सामना आणला अन् त्यानं तो गमावलाही?; तो अयशस्वी प्रयत्न महागात पडला, Video

MI vs RR Latest News : हार्दिक पांड्यानं सामना आणला अन् त्यानं तो गमावलाही?; तो अयशस्वी प्रयत्न महागात पडला, Video

MI vs RR Latest News : १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजय मिळवून दिला. आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले. राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली. हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी करून मुंबई इंडियन्सचा विजयाचा पाया रचला होता, परंतु त्याच्या त्या अयशस्वी प्रयत्नानं सामना फिरला असता.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला ( MI) क्विंटन डी'कॉकच्या रुपानं मोठा धक्का बसला. पण, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी ८३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मुंबई इंडियन्स जेमतेम १७० धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. पहिल्या ९ चेंडूंत केवळ ८ धावा करणाऱ्या हार्दिकनं नंतर गिअर बदलला आणि पुढील १२ चेंडूंत ५२ धावा चोपून काढल्या. हार्दिकच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. हार्दिकनं २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ६० धावा चोपल्या.

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. बेन स्टोक्सनं आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजांची पीसे उपटली. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला. स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. 

सहाव्या षटकातच स्टोक्स माघारी परतला असता...
डावाच्या सहाव्या षटकात बेन स्टोक्स झेलबाद होऊन माघारी परतला असता. कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर स्टोक्सनं खणखणीत फटका मारला. डीप मिडविकेटच्या दिशेनं उत्तुंग उडालेला चेंडू टिपण्यासाठी हार्दिक पांड्या धावला. त्यानं डाईव्हही मारली, परंतु त्याला झेल टिपता आला नाही आणि चेंडू चौकार गेला. त्यावेळी स्टोक्स २६ धावांवर होता. हार्दिकनं तो झेल घेतला असता तर मुंबई इंडियन्सवर पराभूत होण्याची वेळ कदाचित आली नसती. 

पाहा व्हिडीओ... ( 1.02 मिनिटावर आहे तो क्षण)

 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs RR Latest News : Turning Point; Hardik Pandya drops a catch off Krunal Pandya's ball, Ben Stokes survives, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.