MI vs RR Latest News : Hardik Pandya's first nine balls: 8 runs, no boundaries; last 12 balls: 52 runs, seven sixes, two fours, Video | MI vs RR Latest News : Kung Fu पांड्या!, पहिल्या ९ चेंडूंत ८ धावा अन् त्यानंतर ६,१,६,६,६,१,१,६,४,४,६,६! Video

MI vs RR Latest News : Kung Fu पांड्या!, पहिल्या ९ चेंडूंत ८ धावा अन् त्यानंतर ६,१,६,६,६,१,१,६,४,४,६,६! Video

MI vs RR Latest News & Live Score: चेन्नई सुपर किंग्सचा अडथळा मार्गातून दूर केल्यानंतर राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) त्यांचे स्पर्धेतील आव्हान वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) तगड्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या सेवेला मुकावे लागले. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर तो विश्रांतीवर आहे. कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

फॉर्मात असलेला क्विंटन डी'कॉक ( ६) पहिल्याच षटकात माघारी परतला. जोफ्रा आर्चरनं त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांची ८३ धावांची भागीदारी कार्तिक त्यागीनं संपुष्टात आणली. इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. जोफ्रा आर्चरनं बाऊंड्री लाईनवर त्याचा अफलातून झेल घेतला. त्यानंतर श्रेयस गोपाळानं MI ला दोन धक्के दिले. यादव २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर, तर किरॉन पोलार्ड ६ धावांवर माघारी परतला. पण, हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. अंकित राजपूतच्या एका षटकात हार्दिकनं सलग तीन षटकारांसह २७ धावा चोपल्या. ३४ धावा करणाऱ्या सौरभला आर्चरनं बाद केले. 

हार्दिक पांड्यानं २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. कार्तिक त्यागीनं टाकलेल्या २०व्या षटकात हार्दिकनं २७ धावा कुटल्या. हार्दिक २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६० धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. यंदाच्या मोसमातील हे तिसरे जलद अर्धशतक आहे. निकोलस पूरन  ( 17 चेंडू), संजू सॅमसन ( 19 चेंडू) हे या विक्रमात आघाडीवर आहेत.
पाहा व्हिडीओ...

 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs RR Latest News : Hardik Pandya's first nine balls: 8 runs, no boundaries; last 12 balls: 52 runs, seven sixes, two fours, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.