MI vs RR Latest News : बेन स्टोक्सनं विजयानंतर मधलं बोट का लपवलं? Video व्हायरल झाल्यानंतर Emotional सत्य आलं समोर!

बेन स्टोक्सनं आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजांची पीसे उपटली. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला

By स्वदेश घाणेकर | Published: October 26, 2020 08:00 AM2020-10-26T08:00:00+5:302020-10-26T08:00:07+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR Latest News : Ben Stokes dedicated his century to his father who is battling with brain cancer, Video | MI vs RR Latest News : बेन स्टोक्सनं विजयानंतर मधलं बोट का लपवलं? Video व्हायरल झाल्यानंतर Emotional सत्य आलं समोर!

MI vs RR Latest News : बेन स्टोक्सनं विजयानंतर मधलं बोट का लपवलं? Video व्हायरल झाल्यानंतर Emotional सत्य आलं समोर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RR Latest News : १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजय मिळवून दिला. आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले. राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली. 

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला ( MI) क्विंटन डी'कॉकच्या रुपानं मोठा धक्का बसला. पण, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी ८३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मुंबई इंडियन्स जेमतेम १७० धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत होते, परंतु हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. पहिल्या ९ चेंडूंत केवळ ८ धावा करणाऱ्या हार्दिकनं नंतर गिअर बदलला आणि पुढील १२ चेंडूंत ५२ धावा चोपून काढल्या. हार्दिकच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. हार्दिकनं २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ६० धावा चोपल्या.

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. बेन स्टोक्सनं आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजांची पीसे उपटली. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला. स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. 


भावनिक स्टोक्स....
बेन स्टोक्स यंदाची आयपीएल खेळणार की नाही, याबाबतही साशंकता होती. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतूनही बेन स्टोक्सनं माघार घेतली होती. त्याचे वडील गेड हे कॅन्सरशी झगडत आहेत आणि ते न्यूझीलंडमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे स्टोक्स यंदाच्या आयपीएलला मुकण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, वडिलांच्या सांगण्यावरून स्टोक्स दुबईत दाखल झाला आणि आज त्यानं तुफानी खेळी केली. शतकानंतर त्यानं मधल बोट लपवून सेलिब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशनमागे एक भावनिक कारण आहे. स्टोक्सचे वडील गेड हे रग्बीपटू होते. 1980मध्ये रग्बी सामन्यात त्यांना त्यांच्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमवावा लागला होता. त्यावेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नव्हते. स्टोक्सनं आजचं हे शतक त्यांना समर्पित केले.



यापूर्वीही 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयाचा नायक बेन स्टोक्सनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विक्रमी कामगिरीनंतर असं सेलिब्रेशन केलं होतं.  

पाहा व्हिडीओ... 

Web Title: MI vs RR Latest News : Ben Stokes dedicated his century to his father who is battling with brain cancer, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.