MI vs RCB Latest News : रोहित शर्माची विक्रमाची प्रतीक्षा लांबली, अवघ्या दोन धावांनी आज संधी हुकली

MI vs RCB Latest News :मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली.

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 09:49 PM2020-09-28T21:49:06+5:302020-09-28T21:52:01+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RCB Latest News : Rohit Sharma wait for IPL 5000 runs is still on, he out on 8 runs against RCB  | MI vs RCB Latest News : रोहित शर्माची विक्रमाची प्रतीक्षा लांबली, अवघ्या दोन धावांनी आज संधी हुकली

MI vs RCB Latest News : रोहित शर्माची विक्रमाची प्रतीक्षा लांबली, अवघ्या दोन धावांनी आज संधी हुकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत.  मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली. शिवम दुबेनं ( Shivam Dube) अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. 

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. दुसऱ्या व तिसऱ्या षटकात फिंचला अनुक्रमे कृणाल पांड्या व रोहित शर्मा यांनी जीवदान दिले. कृणालसाठी झेल थोडासा अवघड होता, परंतु ट्रेंट बोल्टनं टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला रोहित शर्मानं फिंचचा झेल सोडला. फिंच तेव्हा अवघ्या 10 धावांवर होता. राहुल चहरनं पाचवं षटक टाकलं आणि फिंचनं त्यावर 14 धावा कुटल्या. RCBनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 59 धावा केल्या. फिंचनं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. 10व्या षटकात कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) एक अजब चेंडू टाकला. त्यानं केदार जाधव, लसिथ मलिंगा यांच्यासह स्वतःची शैली मिश्रित करून 10व्या षटकाचा पाचवा चेंडू फेकला.

विराट कोहलीचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरच्या गुगलीवर विराट ( 3) रोहित शर्माच्या हाती सोपा झेल देऊन माघारी परतला. 14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला. देवदत्तनं 16व्या षटकात किरॉन पोलार्डला खणखणीत चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. 37 चेंडूंत त्यानं हे अर्धशतक पूर्ण केलं. तिसऱ्या सामन्यातील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. AB de Villiersने आजच्या सामन्यात IPL मधील 4500 धावांचा पल्ला पार करण्याचा विक्रम नावावर केला. पडीक्कल 40 चेंडूंत 54 धावांवर माघारी परतला. त्यानंतर डिव्हिलियर्सनं फटकेबाजी करताना 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 20 षटकांत 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. 


एबीनं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेनं 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या. MI कडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. जेम्स पॅटिसन्सनं 4 षटकांत 51, जसप्रीत बुमराहनं 4 षटकांत 42 धावा दिल्या. त्यांना एकही विकेट घेता आली नाही. 

लक्ष्याचा पाठलाग करताना MIला आक्रमक सुरुवात करून देणे अपेक्षित होते. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या षटकात दहा धावा केल्या. पण, दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरनं MIला मोठा धक्का दिला. पवन नेगीनं त्याचा ( 8) झेल टिपला अन् विराट कोहलीनं जल्लोष साजरा केला. इसुरू उडानानं ( Isaru Udana) तिसऱ्या षटकात मुंबईला आणखी एक धक्का दिला. सुर्यकुमार यादव ( 0) बाद झाला, एबीनं यष्टिंमागे त्याचा सुरेख झेल टिपला. रोहित शर्माला या सामन्यात 10 धावा करून IPL मध्ये 5000 धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती, परंतु तो 8 धावांवर बाद झाला. आता त्याता हा विक्रम नोंदवण्यासाठी 1 ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या ( KXIP) सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. 

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली ( Virat Kohli) - 179 सामने, 5427 धावा
सुरेश रैना ( Suresh Raina) - 193 सामने, 5368 धावा
रोहित शर्मा ( Rohit Sharma) - 190 सामने, 4998 धावा
डेव्हिड वॉर्नर ( David Warner) - 128 सामने, 4748 धावा
शिखर धवन ( Shikhar Dhawan) - 161 सामने, 4614 धावा
एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers ) - 157 सामने, 4511*

Web Title: MI vs RCB Latest News : Rohit Sharma wait for IPL 5000 runs is still on, he out on 8 runs against RCB 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.