MI vs RCB Latest News : Oh hello Kedar Krunal Malinga, Variation in the run-up, A round-arm action, A little one that will do Malinga proud, Video | MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video

MI vs RCB Latest News : केदार, मलिंगा की कृणाल; MI गोलंदाजाच्या अतरंगी चेंडूचीच चर्चा, पाहा Video

MI vs RCB Latest News : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोन स्टार खेळाडूंचा खेळही या सामन्यात पाहायला मिळणार असल्यानं सर्वच उत्सुक आहेत.  मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. RCBच्या आरोन फिंच ( Aaron Finch), देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) यांनी अर्धशतकं झळकावली. शिवम दुबेनं ( Shivam Dube) अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचून RCBला मोठा पल्ला गाठून दिला. या सामन्यात कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) टाकलेल्या एका अतरंगी चेंडूनं सर्वांचे लक्ष वेधले. 

आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी सावध सुरुवात केली. 9व्या षठकात ट्रेंट बोल्टनं RCBला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या.  14व्या षटकात देवदत्त पडीक्कलने MIचा गोलंदाज जेम्स पॅटिसन्स ( James Pattinson ) याला सलग दोन षटकार खेचून RCBला शतकी पल्ला पार करून दिला.  पडीक्कल 40 चेंडूंत 54 धावांवर माघारी परतला. त्यानंतर डिव्हिलियर्सनं 24 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारासह नाबाद 55, तर शिवम दुबेनं 10 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारासह नाबाद 27 धावा केल्या.  RCBनं 20 षटकांत 3 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. MI कडून ट्रेंट बोल्टनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. जेम्स पॅटिसन्सनं 4 षटकांत 51, जसप्रीत बुमराहनं 4 षटकांत 42 धावा दिल्या. त्यांना एकही विकेट घेता आली नाही. 

लक्ष्याचा पाठलाग करताना MIला आक्रमक सुरुवात करून देणे अपेक्षित होते. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या षटकात दहा धावा केल्या. पण, दुसऱ्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरनं MIला मोठा धक्का दिला. पवन नेगीनं त्याचा ( 8) झेल टिपला अन् विराट कोहलीनं जल्लोष साजरा केला. इसुरू उडानानं ( Isaru Udana) तिसऱ्या षटकात मुंबईला आणखी एक धक्का दिला. सुर्यकुमार यादव ( 0) बाद झाला, एबीनं यष्टिंमागे त्याचा सुरेख झेल टिपला. MI ला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 बाद 35 धावांवर समाधान मानावे लागले. क्विंटन डी कॉकही ( 14) स्वस्तात माघारी परतला. युजवेंद्र चहलनं त्याच्या पहिल्याच षटकात MIला धक्का दिला. MI ला पहिल्या दहा षटकांत 3 बाद 63 धावाच करता आल्या आहेत.

कृणालनं हा चेंडू कधी टाकला?
10व्या षटकात कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) एक अजब चेंडू टाकला. त्यानं केदार जाधव, लसिथ मलिंगा यांच्यासह स्वतःची शैली मिश्रित करून 10व्या षटकाचा पाचवा चेंडू फेकला.


वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs RCB Latest News : Oh hello Kedar Krunal Malinga, Variation in the run-up, A round-arm action, A little one that will do Malinga proud, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.