वर्णद्वेषाविरुद्ध अनेक खेळाडू मैदानात

अमेरिकेत पोलिसांकडून झालेल्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येनंतर संपूर्ण विश्व ढवळून निघाले. या घटनेचा निषेध सर्व क्षेत्रांतून होत असताना क्रीडा विश्वानेही याची दखल घेत तीव्र विरोध नोंदवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 02:49 AM2020-06-14T02:49:07+5:302020-06-14T02:49:49+5:30

whatsapp join usJoin us
Many players supports agitation against racism | वर्णद्वेषाविरुद्ध अनेक खेळाडू मैदानात

वर्णद्वेषाविरुद्ध अनेक खेळाडू मैदानात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर

आयपीएलदरम्यान माझ्यावर वर्णभेदी टीका झाल्याचा दावा करत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने खळबळ उडवली. ही टीका ज्याने केली त्याचे नाव सॅमीने अद्याप उघड केले नसून त्याच्याकडून याविषयी मिळालेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचेही सॅमीने सांगितले. त्यामुळेच सॅमीने त्या खेळाडूकडून याप्रकरणी आपली माफी मागण्याची मागणी केली.

अमेरिकेत पोलिसांकडून झालेल्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येनंतर संपूर्ण विश्व ढवळून निघाले. या घटनेचा निषेध सर्व क्षेत्रांतून होत असताना क्रीडा विश्वानेही याची दखल घेत तीव्र विरोध नोंदवला आहे. अनेक आजी-माजी खेळाडू या घटनेच्या विरोधात पुढे येत आहेत. सॅमीने केलेल्या दाव्यानुसार, आयपीएलदरम्यान त्याला वर्णभेदी टीकेला सामोरे जावे लागले. सॅमीने सांगितले की, संघातील खेळाडू त्याला ‘कालू’ म्हणायचे.

सॅमीे म्हणाला की, ‘मला वाटले होते की कालू म्हणजे घोडा. सॅमीने असेही सांगितले की, त्याने २०१४ मध्ये संघाचे मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वत:चा उल्लेख ‘डार्क कालू’ असा केला होता. न्यूयॉर्कस्थित भारतीय वंशाचा विनोदी कलाकार हसन मिन्हाज याचा एक कार्यक्रम पाहताना सॅमीला ‘कालू’ शब्दाचा अर्थ कळला. कृष्णवर्णीय लोकांसाठी हा शब्द कसा वापरला जातो हे मिन्हाजने सांगितले. यानंतर सॅमीनेही स्वत:वर झालेल्या टीकेची माहिती सर्वांसमोर आणली. यानंतर भारतातही असे प्रकार घडत असल्याचे अनेकांनी सांगितले. अनेक भारतीय खेळाडूंनी त्यांना कशाप्रकारे टीकेला सामोरे जावे लागले किंवा लागते याची माहिती दिली.

अन्य एक माजी हॉकी कर्णधार दिलीप तिर्की यानेही स्वत:चा अनुभव सांगितला की, ‘आदिवासी समाजातून असल्याने अनेकदा शिबिरादरम्यान माझ्याकडे सहकारी खेळाडू दुर्लक्ष करायचे.’ जागतिक स्तरावर सध्या गाजत असलेल्या या प्रकाराने अनेक खेळाडू जागृत झाले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने स्वत:लाच एक प्रश्न विचारला आहे की, ‘क्रिकेटमधील वर्णद्वेषाच्या प्रश्नाकडे मुद्दामहून दुर्लक्ष करण्यात येत आहे का? एक खेळाडू आणि खेळ म्हणून याप्रकरणी आपल्याला अधिक सजग राहण्याची गरज आहे.’ भारतात आता वंशभेदाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतरही देशाच्या क्रीडा क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती अजूनही गप्प राहिल्या आहेत. मागील अशा अनेक प्रसंगांकडे पाहिले, तर हे एक वैशिष्ट्य असल्याचे दिसून येईल, विकृती नाही. अन्यथा अप्रासंगिक किंवा दोषपूर्ण बाबींबद्दल आपले मत मांडण्यात भारतातील अनेक नामवंत व्यक्ती पुढे असतात. पण यासही अपवाद आहेत ते इरफान पठाण आणि ज्वाला गुट्टा. या दोघांनी सातत्याने आपले स्पष्ट मत मांडले आहे.

क्रिकेटपटूंमध्ये अभिनव मुकुंद, डोडा गणेश आणि आकाश चोप्रा यांनीही त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन केले. वंशवाद केवळ वर्णावरून होतो असे नाही. मणिपूरची बॉक्सर सरिता देवी हिला उत्तर-पूर्व प्रदेशातील असल्याने रेल्वेत एका टीसीकडून त्रास सहन करावा लागला होता..भारताचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले यांनाही वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले असून मित्र, नातेवाईक, शाळा आणि कामाच्या ठिकाणीही त्यांना अशी टीका सहन करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Many players supports agitation against racism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.