Like Lokesh Rahul, befriend Anushka Sharma and get a place in the Indian team | 'लोकेश राहुलसारखी अनुष्का शर्माबरोबर मैत्री करा आणि भारतीय संघात स्थान मिळवा'
'लोकेश राहुलसारखी अनुष्का शर्माबरोबर मैत्री करा आणि भारतीय संघात स्थान मिळवा'

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारताचा एक युवा खेळाडू चांगली फलंदाजी करत आहेत. पण त्याचा विचार भारतीय संघासाठी केला जात नाही. जर एखादा फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करत असेल आणि त्याला जर संघात स्थान मिळत नसेल, तर त्याने नेमके करायचे काय, हा मोठा प्रश्न आहे. पण भारतीय संघात जर लोकेश राहुलसारखे स्थान मिळवायचे असेल, तर अनुष्का शर्माशी मैत्री करायला हवी, असा एक संदेश चांगलाच वायरल झाला आहे.

सौराष्ट्रचा शेल्डन जॅक्सन हा चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या वर्षी रणजी क्रिकेट स्पर्धेत ८५४ धावा शेल्डनच्या नावावर आहेत. पण एवढ्या धावा करूनही शेल्डनला भारताच्या कनिष्ठ संघातही स्थान दिले नाही. त्याचबरोबर दुलीप करंडकामध्येही शेल्डनला संधी दिली नाही. शेल्डनने एक ट्विट केले होते. त्या ट्विटला बऱ्याच जणांनी समर्थन दिले होते. 

शेल्डनला तर एका सूर्या नावाच्या एक व्यक्तीने विचित्र कमेंट दिली आहे. त्या व्यक्तीने शेल्डनला सांगितले की," तू लोकेश राहुलसारखीअनुष्का शर्माबरोबर चांगली मैत्री केलीस, तरच तुला भारताच्या संघात स्थान मिळेल."

सूर्याच्या या कमेंटचा शेल्डनने चांगलाच समाचार घेतला आहे. शेल्डन सूर्याला म्हणाला की, " सूर्या तुम्ही कृपया मर्यादा पाळायला हवी. एखादे ट्विट करताना तुम्ही विचार करायला हवा. लोकेश राहुल आणि अनुष्का शर्मा यांचा तुम्ही अपमान केला आहे. क्रिकेट आणि कुटुंब या दोन वेगळ्या गोष्टी आहेत."

सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये भांडण झाल्याचे म्हटले जात आहे. या दोघांमध्ये सध्या विस्तवही जात नाही आणि त्यामुळेच रोहितला वेस्ट इंडिजमधील कसोटी सामन्यांमध्ये संधी दिली नाही, असे क्रिकेट चाहते म्हणत आहेत. पण आता तर कोहली आणि रोहितची पत्नी रितिका सचदेव हे एकत्र डेटिंगवर गेले होते, असे वृत्त आहे.

कोहली आणि रितिका यांचां संबंध २०१० सालापासून असल्याचे म्हटले झाले. २०१० साली रितिका आणि कोहली आयपीएलच्या पार्टीमध्ये भेटले होते. या पार्टीनंतर या दोघांची चांगली ओळख झाली. त्यानंतर तीन वर्षे ती कोहलीबरोबर दिसत होती. पण ही गोष्ट लोकांना मात्र माहिती नव्हती. पण एक गोष्ट अशी घडली की, हे दोघे एका डेटिंगवरर गेले आणि ते पकडले गेले. नेमकं असं घडलं तरी काय होतं...

कोहली आणि रितिका हे २०१० ते २०१३ या तीन वर्षांमध्ये एकत्र होते. त्यावेळी एकदा हे दोघेही सिनेमाच्या डेटिंगला गेले होते. त्यावेळी या दोघांना पाहिले गेले. कोहलीबरोबर असणारी ही मुलगी आहे तरी कोण, हा प्रश्न त्यावेळी बऱ्याच जणांना पडला होता. कारण त्यावेळी रितिका आपला कोहलीबरोबरचा फोटो कोणालाही काढायला देत नव्हती. पण अखेर या दोघांचे फोटो चांगलेच वायरल झाले आणि त्यानंतर ही रितिका असल्याचे सर्वांना समजले.

या तीन वर्षांनंतर रितिका कोहलीजबरोबर जास्त वेळा दिसली नाही. रितिका ही या तीन वर्षांमध्ये कोहलीच्या कंपनीमध्ये कामाला होती. कोहलीच्या कंपनीमध्ये तिच्याकडे स्पोर्ट्स टॅलेंट मॅनेजर हे पद होते. पण त्यानंतर रितिकाने आपली स्वत:ची एक कंपनी काढली आणि तिचा कोहलीच्या कंपनीबरोबरचा संबंध संपला.


Web Title: Like Lokesh Rahul, befriend Anushka Sharma and get a place in the Indian team
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.