स्लिंगा मलिंगाचा क्रिकेटला अलविदा! श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:05 PM2021-09-14T19:05:04+5:302021-09-14T19:07:43+5:30

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, यॉर्कर स्पेशॅलिस्ट लसिथ मलिंगा क्रिकेटमधून निवृत्त

lasith Malinga announces retirement from all forms of cricket | स्लिंगा मलिंगाचा क्रिकेटला अलविदा! श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

स्लिंगा मलिंगाचा क्रिकेटला अलविदा! श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

Next

नवी दिल्ली: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगानं निवृत्ती जाहीर केली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून लसिथ मलिंगा निवृत्त झाला आहे. ३८ वर्षांच्या मलिंगानं सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली. 

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेनं जाहीर केलेल्या संघात मलिंगाला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यानंतरच मलिंगानं निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मलिंगानं ३० कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मार्च २०२० मध्ये पल्लीकलमध्ये मलिंगा वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे.

कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये मलिंगानं ५४६ विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगानं २०११ मध्ये कसोटी आणि २०१९ मध्ये एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली. मात्र तो टी-२० सामन्यांमध्ये खेळत होता. मात्र आता टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान न मिळाल्यानं त्यानं सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lasith Malinga announces retirement from all forms of cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app