दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने घातला धुमाकूळ, 63 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा पराक्रम

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजाने बुधवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 09:57 AM2019-09-19T09:57:14+5:302019-09-19T10:03:37+5:30

whatsapp join usJoin us
Kyle Abbott records best first-class match figures since 1956; took 17 wickets in Hampshire’s County Championship | दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने घातला धुमाकूळ, 63 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा पराक्रम

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांने घातला धुमाकूळ, 63 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज कायले अ‍ॅबोटने बुधवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली. इंग्लिंश कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर क्लबचे प्रतिनिधित्व करताना अ‍ॅबोटने 86 धावांत 17 विकेट्स घेतल्या. 1956 साली जीम लेकर यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. लेकर यांनी 63 वर्षांपूर्वी मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत 90 धावांत 19 विकेट्स घेतल्या होत्या. 


हॅम्पशायर आणि सोररसेट यांच्यातील सामन्यात हा पराक्रम घडला. अ‍ॅबोटने पहिल्या डावात 40 धावांत 9 विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात 46 धावांत 8 विकेट्स घेत हॅम्पशायर संघाला 136 धावांनी विजय मिळवून दिला. या शतकात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 17 विकेट्स घेण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी 2004 मध्ये कॅनडाच्या जॉन डेव्हीसनने अमेरिकेविरुद्ध 17 विकेट्स घेतल्या होत्या. 1950नंतर 17 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा ही तिसरा प्रसंग आहे.

जानेवारी 2017मध्ये अ‍ॅबोटने शेवटचे दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो म्हणाला,''ही कामगिरी अविश्वसनीय आहे.'' कौंटी चॅम्पियनशीपमधील 80 वर्षांत प्रथमच 17 विकेट्स घेतल्या गेल्या आहेत. हॅम्पशायरने पहिल्या डावातील 196 धावांच्या उत्तरात सोमेरसेटचा पहिला डाव 142 धावांवर गडगडला. त्यानंतर जेम्स व्हिंसीच्या 142 धावांच्या जोरावर हॅम्पशायरने दुसऱ्या डावात 226 धावा करताना सोमेरसेटसमोर 280 धावांचे लक्ष्य ठेवले. पण त्यांना 144 धावा करता आल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी
19/90 जीम लेकर 1956
18-?? एफ डब्लू लिलीवहायर 1837
18-96 एच ए आर्सराईट 1861
17-?? एफ पी फेन्नर 1844
17-46 जे विसडन 1853
17-48 सी ब्लीथे  1907
17-50 सीटीबी टर्नर 1888
17-54 डब्लूपी हॉवेल 1902/03
17-56 सीडब्लूएल पार्कर 1925
17-67 एपी फ्रिमन 1922
17-86 कायले अॅबोट 2019 *

Web Title: Kyle Abbott records best first-class match figures since 1956; took 17 wickets in Hampshire’s County Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.