KXIP vs SRH Latest News : शुक्रवारी वडिलांचे झाले निधन अन् शनिवारी तो फलंदाजीला उतरला मैदानावर!

डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 24, 2020 08:01 PM2020-10-24T20:01:10+5:302020-10-24T20:01:59+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs SRH Latest News : Mandeep singh is playing today after Lost his father last night, man hats off to his dedication | KXIP vs SRH Latest News : शुक्रवारी वडिलांचे झाले निधन अन् शनिवारी तो फलंदाजीला उतरला मैदानावर!

KXIP vs SRH Latest News : शुक्रवारी वडिलांचे झाले निधन अन् शनिवारी तो फलंदाजीला उतरला मैदानावर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KXIP vs SRH Latest News : सलग तीन विजय मिळवत आगेकूच करीत असलेला किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि गेल्या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळविणारा सनराजयर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघांदरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज आपली विजयी मोहीम कायम राखण्याचे आव्हान आहे. डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबने आजच्या सामन्यात मयांक अग्रवालला विश्रांती दिली आहे. त्यामुळे लोकेश राहुल व मनदीप सिंग यांनी पंजाबच्या डावाची सुरुवात केली.

मनदीप सिंगनं मैदानावर पाऊल ठेवताच, साऱ्यांनी त्याचे कौतुक केलं. त्याला कारणही तसंच आहे. शुक्रवारी रात्री मनदीप सिंग याचे वडील यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते दुःख बाजूला सोडून मनदीप आज मैदानावर उतरल्यानं साऱ्यांनी त्याचे कौतुक केलं. मनदीपनं यंदाच्या मोसमात ४ सामन्यांत ५० धावा केल्या आहेत. भारताकडून त्यानं ३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं नाबाद ५२ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली आहे. आजच्या सामन्यात तो १७ धावांवर माघारी परतला. 

Sunrisers Hyderabad XI: डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, विजय शंकर, प्रियाम गर्ग, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, खलिल अहमद, संदीप शर्मा, टी नटराजन 

Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मनदीप सिंग, ख्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग 
 

Web Title: KXIP vs SRH Latest News : Mandeep singh is playing today after Lost his father last night, man hats off to his dedication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.