KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 20, 2020 10:31 PM2020-10-20T22:31:21+5:302020-10-20T22:31:51+5:30

whatsapp join usJoin us
KXIP vs DC Latest News : Rishabh Pant tried like KL Rahul ( MIvKXIP super over) to out Pooran but got failed | KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शिखर धवनची ( Shikhar Dhawan) ची बॅट पुन्हा तळपली. दिल्ली कॅपिटल्सन नाणेफेक जिंकून किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ( Kings XI Punjab) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवननं एकहाती खिंड लढवताना Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील सलग चौथ्या सामन्यात ५०+ धावा केल्या. त्यानं सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावून दिल्लीला ( DC) समाधानकार पल्ला गाठून दिला. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या KXIPला पहिल्या पॉवर प्लेमध्ये तीन धक्के बसले. 

पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी DCच्या डावाची सुरुवात केली, परंतु यावेळी ही जोडी फार मोठी भागीदारी करू शकली नाही. पृथ्वी शॉ ( ७) चौथ्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. विकेट पडली असली तरी मागच्या सामन्यातील शतकवीर धवनची फटकेबाजी सुरूच होती. धवनने आयपीएलमधील ४०वे अर्धशतक झळकावले. आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरनंतर ( ४६) ४०+ अर्धशतक करणारा तो दुसराच खेळाडू आहे. रिषभ पंत आणि धवन यांची ३३ धावांची भागीदारी ग्लेन मॅक्सवेलनं तोडली. पंत १४ धावांवर बाद झाला. मार्कस स्टॉयनिस ( ९) लगेच माघारी परतला. शिखर धवन ६१ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर नाबाद राहीला. दिल्लीनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. 

पाहा गंभीरची शतकी खेळी

प्रत्युत्तरात पंजाबला तिसऱ्या षटकात अक्षर पटेलनं मोठा धक्का दिला.     फॉर्मात असलेला लोकेश राहुल ( १५) लगेच मघारी परतल्यानं पंजाबची मालकिण प्रीती झिंटा टेंशनमध्ये दिसली. पण, ख्रिस गेलनं तिचं टेंशन हलकं केल. तुषार देशपांडेच्या एका षटकात गेलनं २६ धावा कुटल्या अन् संघाला अर्धशतकी पल्ला गाठून दिला. गेलचं हे वादळ रोखण्यासाठी आर अश्विनला पाचारण केले गेले आणि त्यानं युनिव्हर्स बॉसचा ( २९) त्रिफळा उडवला. त्याच षटकात निकोलस पूरन आणि मयांक यांच्यातील ताळमेळ चुकला अन् पंजाबला तिसरा धक्का बसला. हो ना हो ना करताना मयांकला विकेट गमवावी लागली आणि पेव्हेलियनमध्ये परतताना त्यानं नाराजी व्यक्त केली.

अश्विनच्या पुढच्या ( ७.५) षटकात पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला. पुरननं फटका मारल्यानंतर एक धाव घेण्यासाठी क्रीज सोडले, परंतु मॅक्सवेलनं त्याला माघारी पाठवले. रिषभ पंतला त्याला रनआऊट करण्याची संधी होती, पण लोकेश राहुलची कॉपी करण्याच्या नादात त्यानं ती गमावली.

Web Title: KXIP vs DC Latest News : Rishabh Pant tried like KL Rahul ( MIvKXIP super over) to out Pooran but got failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.