Kusal Mendis IPL 2025 Gujarat Titans: भारत-पाकिस्तान ( India Pakistan Tensions) तणावानंतर IPL आणि PSL स्थगित करण्यात आले होते. परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परतले होते. जेव्हा या दोन्ही लीग पुन्हा सुरू झाल्या, तेव्हा PSL 2025 च्या काही खेळाडूंनी IPL ला प्राधान्य दिले. त्यांनी पाकिस्तानी लीग मध्येच सोडून IPL मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पण हवाई हल्ल्यांदरम्यान पाकिस्तान सोडताना एका खेळाडूला त्याची किटबॅग तिथेच सोडून द्यावी लागली. हा खेळाडू म्हणजे कुसल मेंडिस. तो आता जोस बटलरच्या जागी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्स संघामध्ये सामील झाला आहे. त्यामुळे, त्याला खेळायचे होते. पण नंतर एका व्यक्तीने त्याला मदत केली आणि किटबॅग परत करण्यासाठी सुमारे २,४०० किलोमीटरचा प्रवास केला.
मेंडिसला त्याची किटबॅग अशी परत मिळाली
सुरक्षेच्या कारणास्तव मेंडिसने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधून माघार घेतली आणि त्याऐवजी IPL 2025 मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याची किटबॅग हे सर्वात महत्त्वाची असते. मेंडिसने या बाबतीत खुलासा केला की तो पाकिस्तानहून त्याची किटबॅग घरी आणू शकला नाही. IPL साठी त्याला भारतात यायचे होते. पाकिस्तानातून किटबॅग आणायचा त्याने प्रयत्न केला. पण सारेच कठीण होऊन बसले होते. पण त्याला यश येत नव्हते. शेवटी वेन नावाच्या माणसाने त्याला मदत केली. वेन हा श्रीलंकेचा आहे पण तो पाकिस्तानमध्ये राहतो. तो किटबॅग घेऊन पाकिस्तानहून कोलंबोला आला आणि त्याने मेंडिसला किटबॅग दिली. यासाठी मेंडिसने त्या व्यक्तीचे आभारही मानले.
कुसल मेंडिस चांगल्या फॉर्ममध्ये
गुजरात टायटन्सचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलर १७ मे पासून पुन्हा सुरू होणाऱ्या IPL 2025चे उर्वरित सामने खेळू शकणार नाही. बटलरची वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघात निवड झाली आहे, ज्यामुळे तो आता गुजरातसाठी सामने खेळू शकणार नाही. त्याने ही माहिती त्याच्या फ्रँचायझीला दिली होती. यानंतर, GT ने पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱ्या कुसल मेंडिसला त्याच्या जागी करारबद्ध केले. PSL 2025 मध्ये कुसल मेंडिसने क्वेटाकडून १६८ च्या स्ट्राईक रेटने १४३ धावा केल्या होत्या.
Web Title: Kusal Mendis explained difficulty bringing kitbag from Pakistan to Sri Lanka before joining ipl 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.