गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील

Fastest Sixes In IPL: गुजरातविरुद्ध सामन्यात केएल राहुलने षटकारांचा विक्रम रचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 17:11 IST2025-04-19T17:08:38+5:302025-04-19T17:11:35+5:30

whatsapp join usJoin us
KL Rahul makes history as fastest Indian to hit 200 sixes in IPL | गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील

गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२५ मधील ३५ वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा तडाखेबाज फलंदाज केएल राहुलने अवघ्या १४ चेंडूत २८ धावा केल्या, ज्यात एका षटकाराचा समावेश आहे. या षटकारासह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली असून तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या पंक्तीत सामील झाला आहे.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने आयपीएलमध्ये २०० षटकारांचा टप्पा गाठला आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो ११ वा खेळाडू ठरला आहे आणि सहावा भारतीय ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, संजू सॅमसन आणि सुरेश रैना यांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २५८ डावात २८६ षटकार मारले आहेत. यादीत विराट कोहली २८२ (२५१ डाव) षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर धोनी, संजू सॅमसन आणि सुरेश रैना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय 
१) रोहित शर्मा- २८६ षटकार
२) विराट कोहली- २८१ षटकार
३) महेंद्रसिंह धोनी- २६० षटकार
४) संजू सॅमसन- २१६ षटकार
५) सुरेश रैना- २०३ षटकार
६) केएल राहुल- २०० षटकार

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात आणि दिल्ली यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ आयपीएलच्या गुणतालिकेत टॉप ४ मध्ये आहेत. दिल्ली १० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर, गुजरात ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

Web Title: KL Rahul makes history as fastest Indian to hit 200 sixes in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.