KKRनं लाखो रुपये मोजून ताफ्यात घेतलेल्या गोलंदाजाची शैली अवैध, IPL 2020ला मुकणार?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020मधील सत्राला सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:33 PM2020-01-08T13:33:28+5:302020-01-08T13:33:54+5:30

whatsapp join usJoin us
KKR bowler Chris Green has been reported for an illegal bowling action, IPL participation could be in doubt too | KKRनं लाखो रुपये मोजून ताफ्यात घेतलेल्या गोलंदाजाची शैली अवैध, IPL 2020ला मुकणार?

KKRनं लाखो रुपये मोजून ताफ्यात घेतलेल्या गोलंदाजाची शैली अवैध, IPL 2020ला मुकणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 2020मधील सत्राला सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. त्यांच्या दोन खेळाडूंना वयचोरी प्रकरणावरून बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यात बुधवारी त्यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक बातमी धडकली. आयपीएल लिलावात त्यांनी नव्यानं दाखल करून घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची शैली अवैध ठरली आहे आणि त्याच्यावर 90 दिवस गोलंदाजी न करण्याची शिक्षा सुनावली आहे. आयपीएललाही तो मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयपीएल 2020 लिलावात कोलकातानं ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससाठी सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मोजली. आयपीएलच्या इतिहासातील कमिन्स हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. कमिन्ससह कोलकाता नाइट रायडर्स संघानं इयॉन मॉर्गन (5.25 कोटी), राहुल त्रिपाठी (60 लाख), वरुण चक्रवर्थी (4 कोटी), एम सिद्धार्थ (20 लाख), टॉम बँटन (1 कोटी), ख्रिस ग्रीन (20 लाख), प्रविण तांबे (20 लाख) आणि निखिल नाईक (20 लाख) यांना आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.


यांच्यापैकी ख्रिस ग्रीनची गोलंदाजी अवैध आढळली आहे. ग्रीन हा सध्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्या गोलंदाजीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 90 दिवसांची बंदी घातली आहे. यामुळे ग्रीनच्या आयपीएल समावेशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

Web Title: KKR bowler Chris Green has been reported for an illegal bowling action, IPL participation could be in doubt too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.