Karnataka create Indian record with 15th T20 win in a row; break Kolkata Knight Riders record | कर्नाटक संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; मोडला KKRचा पाच वर्षांपूर्वीचा विक्रम

कर्नाटक संघाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; मोडला KKRचा पाच वर्षांपूर्वीचा विक्रम

कर्नाटक संघाने सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत शुक्रवारी उत्तराखंड संघावर 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकचा हा विजय भारतातील ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये इतिहास घडवणारा ठरला. शिवाय या विजयानं कर्नाटकनं जगभरात थेट दूसऱ्या स्थानी झेप घेतली. उत्तराखंडचे 6 बाद 132 धावांचे आव्हान कर्नाटकनं 15.4 षटकांत एक विकेट गमावून पुर्ण केले. रोहन कदम ( 67*) आणि देवदूत पड्डीकल ( 53*) यांनी कर्नाटकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कर्नाटकने हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सलग 15 वा विजय ठरला. या कामगिरीसह भारतातील ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग विजय मिळवण्याच मान कर्नाटकने पटकावला. जगभरात आता सलग ट्वेंटी-20 जिंकण्याच्या विक्रमात कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान नॅशनल ट्वेंटी-20 चषक स्पर्धेत सिआलकोट स्टॅलिअन्स संघाने 2006 ते 2010 या कालावधीत सलग 25 सामने जिंकले आहेत. त्यानंतर ओटागो संघ 15 विजयासह दुसऱ्या स्थानी होता. आता कर्नाटकनं त्यांना मागे टाकले आहे.  

कर्नाटकनं इंडियन प्रीमिअर लीगमधील कोलकाता नाइट रायडर्सचा विक्रम मोडला. कोलकाता नाइट रायडर्सनं 2014मध्ये आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20त सलग 14 सामने जिंकले होते. चेन्नई सुपर किंग्सने त्यांची हो घोडदौड थांबवली होती. 

कोण आहे टॉप
25 विजय - सिआलकोट स्टॅलिअन्स 2006-10 
15* विजय - कर्नाटक 2018-19
15 विजय - ओटागो  2012-13
14 विजय - कोलकाता नाइट रायडर्स 2014
13 विजय - सरे 2003-04
13 विजय - अफगाणिस्तान 2016-17

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karnataka create Indian record with 15th T20 win in a row; break Kolkata Knight Riders record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.