Kanpur Test : अचानक कॅमेऱ्यात कैद झाली 'ही'  Mystery Girl, क्रिकेटचे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'

Kanpur Test : भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्रला (Rachin Ravindra) अवघ्या 13 धावांवर बाद केल्यानंतर अचानक एक तरुणी कॅमेऱ्यात कैद झाली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 07:33 PM2021-11-27T19:33:04+5:302021-11-27T19:36:39+5:30

whatsapp join usJoin us
Kanpur Test: This mystery girl was suddenly caught on camera, cricket fans became ‘clean bold’ | Kanpur Test : अचानक कॅमेऱ्यात कैद झाली 'ही'  Mystery Girl, क्रिकेटचे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'

Kanpur Test : अचानक कॅमेऱ्यात कैद झाली 'ही'  Mystery Girl, क्रिकेटचे चाहते झाले 'क्लीन बोल्ड'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मात्र एका अनोळखी तरुणीने सामन्याची मजा आणखीनच वाढवली.

कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवशी भारताचा फिरकीपटू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रविंद्रला (Rachin Ravindra) अवघ्या 13 धावांवर बाद केल्यानंतर अचानक एक तरुणी कॅमेऱ्यात कैद झाली. 

रचिन रविंद्र वाद झाल्यानंतर जल्लोष केला
23 व्या षटकांत रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) रचिन रविंद्रला (Rachin Ravindra)क्लीन बोल्ड करताच या मिस्ट्री गर्लने (Mystery Girl) जल्लोष करण्यात सुरुवात केली, त्यावेळी कॅमेरा या तरूणीकडे वळताच तिला आनंद झाला. 

तरुणीच्या सौंदर्याने क्रिकेट चाहत्यांना वेड
कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियममध्ये (Green Park Stadium) या मिस्ट्री गर्लच्या सौंदर्याने क्रिकेट चाहत्यांना वेड लावले. पांढऱ्या रंगाचा सूट आणि जांभळ्या रंगाचा दुपट्टा यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसली होती, तिच्या कानात झुमके, हातात ब्रेसलेट आणि डोक्यावर सनग्लासेस होता.

गुटखा मॅन सुद्धा झाला होता व्हायरल
या 'मिस्ट्री गर्ल'प्रमाणेच कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये बसून गुटखा खाणाऱ्या एका व्यक्तीमुळे सामना चर्चेत आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

63 धावांची आघाडी
दरम्यान, कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 1 बाद 14 धावा केल्या. यामुळे भारताने न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची आघाडी घेतली. मयंक अग्रवाल 4 आणि चेतेश्वर पुजारा 9 धावा करून नाबाद आहेत.

Web Title: Kanpur Test: This mystery girl was suddenly caught on camera, cricket fans became ‘clean bold’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.