jasprit bumrah and Cheteshwar Pujara honored by BCCI; See which other cricketers got the awards... | बुमराह आणि पुजारा यांचा बीसीसीआयने केला सन्मान; अजून कोणत्या क्रिकेटपटूंना मिळाले पुरस्कार पाहा...

बुमराह आणि पुजारा यांचा बीसीसीआयने केला सन्मान; अजून कोणत्या क्रिकेटपटूंना मिळाले पुरस्कार पाहा...

ठळक मुद्देभारताचे माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे.

मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेटला भरीव योगदान देणाऱ्या आजी-माजी क्रिकेटपटूंचा आज गौरव केला. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला गेल्या वर्षभरात केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी बीसीसीआयने त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान करण्यात केला आहे. त्याचबरोबर मुंबईकर अजिंक्य रहाणेला आणि शिवम दुबे यांनाही आज बीसीसीआयने पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अगरवाल यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला. बीसीसीआयने यावेळी भारताचे माजी क्रिकेटपटू के. श्रीकांत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवले आहे. भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले, पाहा....

 

Web Title: jasprit bumrah and Cheteshwar Pujara honored by BCCI; See which other cricketers got the awards...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.