महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींनी केलं महत्त्वाचं विधान

महेंद्रसिंग धोनीचं मैदानाबाहेर असणं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना उधाण येणं, हे ओघानं आलंच.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 11:13 AM2019-10-09T11:13:31+5:302019-10-09T11:13:50+5:30

whatsapp join usJoin us
It's for MS Dhoni to decide whether he wants to come back: Ravi Shastri | महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींनी केलं महत्त्वाचं विधान

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींनी केलं महत्त्वाचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

महेंद्रसिंग धोनीचं मैदानाबाहेर असणं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना उधाण येणं, हे ओघानं आलंच. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर धोनीनं मायदेशात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल याची शक्यताही फार कमीच आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कॅप्टन कूलच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणाले,''सर्वोत्तम खेळाडू म्हणूनच धोनी निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करायचे याचा निर्णय हा सर्वस्वी धोनीचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर माझी त्याच्याशी भेट झालेली नाही. त्यानं सर्वप्रथम पुन्हा खेळायला सुरुवात करावी आणि त्यानंतर त्याची कामगिरी कशी होते, हे पाहता येईल. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो पुन्हा मैदानावर दिसेल असे मला वाटत नाही. जर त्याची खेळण्याची इच्छा असेल, तर त्यानं नक्कीच निवड समितीला कळवलं असेल.'' 


धोनीच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, पंतच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसत आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) शोधाशोध सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही कर्णधार विराट कोहलीनं पंतच्या जागी वृद्धीमान सहाला खेळवण्याचा निर्णय घेतला.  

रणवीर सिंगने धोनीच्या मुलीचा गॉगल घातला, अन्....
लहान मुलं कधी काय बोलतील आणि त्यांची कल्पनाशक्ती नक्की कुठे चालेला याचा काही नेम नाही. याची प्रचिती प्रत्येक आई वडिलांना आली असेलच, मग त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग अपवाद कसा ठरेल. कॅप्टन कूल धोनीनं मंगळवारी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यात झिवा आणि बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग दिसत आहेत. या दोघांच्या फोटोत त्यांनी घातलेला चष्मा एकसारखा दिसत आहे. त्यावरूनच घडलेला एक प्रसंग धोनीनं इंस्टावर शेअर केला आहे.  

रणवीर सिंग हा त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतो. चित्रविचित्र कपड्यांची त्याची स्टाईल नेहमी चर्चेत राहिली आहे. आता त्याचा गॉगल चर्चेत आहे. झिवाच्या स्टाईलमधून प्रेरणा घेत रणवीरनं तो गॉगल घातल्याचा दावा धोनीच्या मुलीनं केला आहे. धोनीनं लिहिले की,''रणवीरचा फोटो पाहिल्यानंतर त्यानं तिचा गॉगल का घातला, असा प्रश्न झिवाला पडला होता. पण, ती तिच्या खोलीत गेली आणि स्वतःचा गॉगल शोधून आणला. आताची पोरं काय विचार करतील याचा नेम नाही. साडेचार वर्षांचा असताना मला हे कळलेही नसते. जेव्ही ती रणवीरला भेटेल तेव्हा त्याला याबद्दल नक्की विचारेल.'' 
 

Web Title: It's for MS Dhoni to decide whether he wants to come back: Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.