IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख

ज्या ज्या वेळी पराभवूत झालो त्या त्या वेळी ट्रोलर्सचा सामना केला, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 03:06 IST2025-06-04T02:56:35+5:302025-06-04T03:06:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Virat Kohli After RCB Win First Trophy He Says I Will Sleep Like Baby | IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख

IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Virat Kohli On Maiden IPL Title :  विराट कोहली अखेर १७ वर्षांचा दुष्काळ संपवत आयपीएल चॅम्पियन झाला. खास गोष्ट ही की, १८ क्रमांकाची जर्सी घालून मिरवणारा किंग कोहलीला १८ व्या हंगामात IPL ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार झाले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनल सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरले. या जेतेपदामुळे कोहलीच मन हलके झाले आहे. त्यामुळेच सेलिब्रेशनपेक्षा मी आता चांगली झोप घेऊ शकेन, असे तो म्हणाला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेमकं काय म्हणाला विराट?


सामन्यानंतर आपल्या मनातील भावना व्यक्त करताना विराट कोहली म्हणाला की, हा विजय संघाप्रमाणेच आरसीबीच्या प्रत्येक चाहत्याचाही आहे. १८ वर्षे मी या संघाला सर्वकाही दिले. प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला. हा विजय माझ्यासाठी खास आहे. खेळाडूच्या रुपात खूप मेहनत घेतली. पण जगातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकू शकलो नाही याची खंत मनात होती. प्रत्येक हंगामानंतर फ्रँचायझीसह मी ट्रोलचाही सामना केलाय. पण आता आम्ही जिंकलोय. आता मी लहान मुलाप्रमाणे झोपू शकेन. (कोणतीही चिंता न करता शांत झोप येईल.)

हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)

IPL ट्रॉफी जिंकल्यावर व्यक्त केलं कसोटीवरील प्रेम

विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. वनडेसह तो आता फक्त आयपीएलमध्येच खेळताना दिसेल. आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकल्यावर त्याने कसोटी क्रिकेटवरील प्रेमही व्यक्त केले. कसोटी क्रिकेटमधील क्षण माझ्यासाठी नेहमीच अव्वलस्थानी राहिला आहे, असे सांगत त्याने युवा क्रिकेटर्संनी कसोटीला पहिली पसंती द्यावी, हा सल्लाही दिलाय. 

४ आयसीसी स्पर्धा गाजवल्यावर १८ व्या वर्षी जिंकली पहिली आयपीएल ट्रॉफी

विराट कोहली हा आयसीसीच्या चार ट्रॉफी जिंकणारा खेळाडू आहे. २०११ मध्ये पहिल्यांदा तो वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग राहिला. २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकणाऱ्या संघातही तो होता. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि २०२५ मध्ये पुन्हा त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकल्याचे पाहायला मिळाले. आता आयपीएल ट्रॉफीही त्याच्या हातात आली आहे.
 

Web Title: IPL 2025 Virat Kohli After RCB Win First Trophy He Says I Will Sleep Like Baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.