IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

मोहम्मद सिराजचा घरच्या मैदानावर जलवा; हैदराबादच्या सलामी जोडीला स्वस्तात धाडले तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 20:16 IST2025-04-06T20:08:16+5:302025-04-06T20:16:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 SRH vs GT Mohammad Siraj strikes early for Gujarat Titans, sends back Travis Head for 8 Runs Also Take Wicket Of Abhishek Sharma | IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

IPL 2025 SRH vs GT : घरच्या मैदानात सिराजचा जलवा! ट्रॅविस हेडसह अभिषेक शर्माची विकेट घेत केली हवा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 SRH vs GT Mohammad Siraj vs Travis Head : मोहम्मद सिराजनं आपल्या घरच्या मैदानातही आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये नव्या चेंडूवर धमक दाखवण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजनं स्फोटक सलामीवीर ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या षटकात ट्रॅविस हेडनं सिराजला दोन चौकार मारले. पण एवढ्यावरच त्याला तंबूत परतावे लागले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सिराजनं पहिल्याच षटकात घेतली 'हेड' मास्टरची शाळा

गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर मोहम्मद सिराज हैदराबाद संघाकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅविस हेड या जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्मानं सिराजच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राइक हेडला दिले. दुसऱ्या चेंडूवर बॅटची कड घेऊन गेलेल्या चेंडूवर हेडला चौकार मिळाला. या चौकाराने खाते उघडल्यावर तिसऱ्या चेंडूवर ट्रॅविस हे़डनं एक खणखणीत चौकार मारला. पण त्यानंतर एक चेंडू निर्धाव टाकत पाचव्या चेंडूवर सिराजनं हेडला साई सुदर्शन करवी झेल बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला.  

टीम इंडियातून वगळलं ते ठरलं भल्याचं! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करायला मिळालं बळ

आयपीएलमध्ये पाचव्यांदा केली शिकार

आंतरारष्ट्रीय स्तरावरील सामना असो की आयपीएल मोहम्मद सिराज वर्सेस ट्रॅविस यांच्यातील सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आयपीएलमध्ये पाचव्यांदा DSP सिराजनं ऑस्ट्रेलियन स्फोटक फलंदाज हेडला आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळाले. २०२० आणि २०२३ च्या हंगामात प्रत्येकी एक वेळा सिराजनं ट्रॅविस हेडची शिकार केली होती. गत हंगामात दोन वेळा सिराजनं बाजी मारल्याचे पाहायला मिळाले होते. यंदाच्या हंगामातही मियाँ मॅजिकसमोर  'हेड' मास्टर फेल ठरल्याचे पाहायला मिळाले.

पॉवर प्लेमध्ये अभिषेकलाही धाडले तंबूत

ट्रॅविस हेडची विकेट मिळवल्यावर शुबमन गिलनं पॉवर प्लेमध्ये पाचव्या षटकातही चेंडू सिराजकडे देण्याचा डाव खेळला. आपल्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात सिराजनं कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत अभिषेक शर्माच्या रुपात संघाला आणखी एक विकेट मिळवून दिली. दुसऱ्या स्फोटक सलामीवीराला त्याने १८ धावांवर तंबूत धाडले. ब्रेक मिळाल्यावर सिराज अधिक वेगानं भेदक मारा करताना दिसत आहे.

Web Title: IPL 2025 SRH vs GT Mohammad Siraj strikes early for Gujarat Titans, sends back Travis Head for 8 Runs Also Take Wicket Of Abhishek Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.