Vaibhav Suryavanshi Smashed First Ball Six On His IPL Debut : आयपीएलच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने षटकार मारत खाते उघडल्याचे पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याने कडक सिक्सर मारत आपले तेवर दाखवून दिले. १४ वर्षी पोराचा हा अंदाज सर्वांना आवाक करून सोडणारा असाच आहे. दुसऱ्या षटकात त्याने आवेश खान याचे स्वागतही षटकाराने केले. 'मूर्ती लहान पण किर्तीमान महान' ही झलक दाखवायला त्याने फार वेळ घेतला नाही. १४ वर्षाच्या पोरानं ८० मीटर लांब षटकार मारत आपल्या बॅटिंगची धमक दाखवून दिली. आयपीएलच्या पदार्पणाच सिक्सर मारून खाते उघडणारा वैभव सूर्यंवशी हा दहावा फलंदाज ठरला. पण याआधी षटकार मारणाऱ्यांच्या यादीतही तो आघाडीवर आहे. कारण तो फक्त १४ वर्षांचा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना पंतच्या नेतृत्वाखालील LSG संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १८० धावा करत RR समोर १८१ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यंवशी या जोडीनं राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. यशस्वीसोबत मैदानात उतरताच वैभव सूर्यंवशी याने इतिहास रचला. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला. १४ वर्षे २३ दिवस वय असताना त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. याआधी हा रेकॉर्ड प्रयास रे बर्मन या भारतीय खेळाडूच्या नावे होता.२०१९ च्या हंगामात १६ वर्षे १५७ दिवस वय असताना त्याने आरसीबीकडून सनरायझर्स विरुद्ध पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले होते.
आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारणारे फलंदाज
- रॉब क्विनी (RR)
- केव्हॉन कूपर (RR)
- आंद्रे रसेल (KKR)
- कार्लोस ब्रॅथवेट (DD)
- अनिकेत चौधरी (RCB)
- जावोन सेर्ल्स (KKR)
- सिद्धेश लाड (MI)
- महेश थेक्षाना (CSK)
- समीर रिझवी (CSK)
- वैभव सूर्यवंशी (RR)
Web Title: IPL 2025 RR vs LSG Vaibhav Suryavanshi Smashed First Ball Six On His IPL Debut Against Shardul Thakur Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.