यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने एका हंगामात दोन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 23:43 IST2025-05-03T23:42:23+5:302025-05-03T23:43:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 RCB vs CSK Yash Dayal heroics in final over guides RCB to narrow 2 run win vs Chennai in thriller | यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला

यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या २०० पारच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्जला रोखून दाखवले. या सामन्यातील विजयासह RCB च्या संघाने १६ गुण आपल्या खात्यात जमा करत प्लेऑफ्सचं आपलं तिकिट जवळपास पक्के केले आहे. अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना रजत पाटीदार याने यश दयालच्या हाती चेंडू सोपवला. मॅच फिनिशर महेंद्रसिंह धोनी आणि सेट झालेला जडेजा क्रिजवर होते. पण अखेरच्या षटकात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा अन् मॅच फिनिशरच्या रुपात ओळखला जाणारा धोनी यश दयालसमोर फिका ठरला. धोनी बाद झाल्यावर सामन्यात नो बॉलच ट्विस्ट आलं. परिणामी शेवटच्या ३ चेंडूत ६ धावा उरल्या होत्या. पण यश दयालनं उर्वरित ३ चेंडूत फक्त ३ धावा खर्च करत संघाला २ धावांनी विजय मिळवून दिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 CSK च्या संघाला ३ चेंडूत ६ धावा नाही काढता आल्या 
 

पहिल्या दोन चेंडूवर यश दयालनं धोनीसह जडेजाला  मोठा फटका मारण्यापासून रोखलं. या दोन चेंडूवर फक्त दोन धावा आल्या. ४ चेंडूत १३ धावांची गरज असताना महेंद्रसिह धोनी पायचित झाला.  ३ चेंडूत १३ धावांची गरज असताना धोनीची जागा घेण्यासाठी आलेल्या शिवम दुबेनं षटकार मारला अन् सामन्यात पुन्हा ट्विस्ट आले. रिव्ह्यूच्या मदतीनो तो चेंडू नो बॉल ठरल्यावर CSK च्या संघाला अखेरच्या ३ चेंडूत ६ धावा उरल्या होत्या.  पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत यश दयालनं हातून निसटतोय असे वाटणारा सामना संघाच्या बाजूनं फिरवला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने एका हंगामात दोन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे.

जड्डूसह आयुष म्हात्रेची दमदार खेळी ठरली व्यर्थ

आरसीबीच्या संघाने दिलेल्या २१४ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रे याने ४८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजाने ४५ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. तो शेवटपर्यंत थांबला. पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. धोनीनं ८ चेंडूत १२ धावा करताना एक षटकार मारला. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या शिवम दुबेनं एक षटकार मारून CSK ला विजयाच्या जवळ आणले. पण फ्री हिटच्या संधीचं सोन करत तो मोठी फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. परिणामी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला.

रोमारियो शेफर्डची वादळी खेळी

पहिल्यांदा फलंदाजी करताना जेकब बेथेल ५५ (३३) आणि विराट कोहली ६२ (३३) या जोडीनं आरसीबीच्या संघाला दमदार  सुरुवात करून दिली. ही जोडी तंबूत परतल्यावर आरसीबीची धावगती पुन्हा मंदावली होती. पण अखेरच्या षटकात रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) याने १४ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने नाबाद ५३ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर २१३ धावा लावल्या. RCB चा संघ या खेळीमुळे चेन्नईपेक्षा भारी ठरला.

 

Web Title: IPL 2025 RCB vs CSK Yash Dayal heroics in final over guides RCB to narrow 2 run win vs Chennai in thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.