यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

Yashasvi Jaiswal: गुजरातविरुद्ध सामन्यात यशस्वी जैस्वालकडे एलिट लिस्टमध्ये सामील होण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:43 IST2025-04-28T17:41:54+5:302025-04-28T17:43:07+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: Rajasthan Royals Yashasvi Jaiswal eyeing unique milestone vs GT in Jaipur | यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०२५ च्या ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स ऐकमेकांशी भिडणार आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळला जाणारा हा सामना राजस्थानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघाला हा सामना जिंकायचा आहे. राजस्थानला सलग ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ नवव्या स्थानावर आहे. राजस्थानने पंजाबविरुद्ध ५ एप्रिल रोजी खेळण्यात आलेल्या सामन्यात अखेरचा विजय मिळवला होता. 

या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या हंगामात राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा जैस्वाल आता इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. जैस्वाल आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त ३७ धावा दूर आहे. जयस्वाल गुजरातविरुद्ध ही कामगिरी करू शकतो. आतापर्यंत राजस्थानमधील फक्त ४ फलंदाजांना आयपीएलमध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यश आले. या खास यादीत समील होणारा जयस्वाल हा राजस्थानचा पाचवा फलंदाज असेल.

राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज: 
संजू सॅमसन- ३ हजार ९६६ धावा
जोस बटलर- ३ हजार ५५ धावा
अजिंक्य रहाणे- २ हजार ८१० धावा
शेन वॉटसन- २ हजार ३७२ धावा
यशस्वी जैस्वाल- १ हजार ९६३ धावा

राजस्थानचा आघाडीचा फलंदाज
जयस्वी जैस्वालने २०२० मध्ये राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. जैस्वालने कारकिर्दीतील पहिल्या हंगामात तीन सामन्यात फक्त ४० धावा केल्या. त्यानतंर दोन हंगामात २०० हून अधिक धावा केल्या. आयपीएल २०२३ मध्ये जैस्वालने दमदार कामगिरी केली. या हंगामात त्याच्या बॅटमधून ६२५ धावा निघाल्या. आयपीएल २०२४ मध्ये त्याने ४२५ धावा केल्या. या हंगामात त्याने ३५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Web Title: IPL 2025: Rajasthan Royals Yashasvi Jaiswal eyeing unique milestone vs GT in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.