IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

विकेट किपर बॅटर जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत संघाचा विजय केला निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:31 IST2025-04-20T20:28:32+5:302025-04-20T20:31:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs RCB 37th Virat Kohli Anchors Another Successful Chase On Record Breaking Day Royal Challengers Bengaluru Keep Away Record Win Against Punjab Kings | IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, 37th Match : पंजाब किंग्जच्या घरच्या मैदानात विराट कोहलीच्या विक्रमी अर्धशतकासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दिमाखदार विजय नोंदवला. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्याशिवाय या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या भात्यातून ३५ चेंडूत ६१ धावांची दमदार खेळी आली. विकेट किपर बॅटर जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत संघाचा विजय निश्चित केला. या विजयासह RCB च्या संघाने बाहेरच्या मैदानात (Away Matcn) सलग पाचवा विजय नोंदवत आपल्या खात्यात १० गुण जमा केले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दमदार सुरुवात केल्यावर पंजाबची फलंदाजी कोलमडली

रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. क्रुणाल पांड्या, सुयश शर्मा, जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना उत्तम गोलंदाजी केली. प्रियांश आर्य २२ (१५), प्रभसिमरन सिंग ३३ (१७), जॉश इंग्लिस २९ (१७), शशांक सिंग ३१ (३३) आणि मार्को यान्सेन याने २५ (२०) केलेल्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारली होती. आरसीबीकडून क्रुणाल पांड्या आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी २-२ तर रोमारिओ शेफर्डनं एक विकेट घेतली.

Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...

सॉल्ट स्वस्तात परतला, मग देवदत्त पडिक्कल अन् विराट कोहली जोडी जमली

या धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या ६ धावा असताना पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगनं फिल सॉल्टला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने ३ चेंडूत १ धाव केली. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचली.  पडिक्कलनेही ६१ (३५) अर्धशतक झळकावले. कर्णधार रजत पाटीदार १२ धावा करून परतल्यावर जितेश शर्मा मैदानात आला त्याने सिक्सर मारत मॅच संपवली. दुसऱ्या  बाजूला विराट कोहली ५४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांची नाबाद खेळी केली. 

Web Title: IPL 2025 PBKS vs RCB 37th Virat Kohli Anchors Another Successful Chase On Record Breaking Day Royal Challengers Bengaluru Keep Away Record Win Against Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.